

Raju Shetti addresses media, demanding strict action against sugar mills over pending FRP dues.
sakal
पुणे : दोन महिने उलटूनही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी मिळालेली नाही. पाच हजार कोटींहून अधिक एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर आयुक्तांनी जप्तीची कारवाई करावी. ते टाळल्यास आम्ही अवमान याचिका दाखल करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.