Raju Shetty
पुणे - ‘स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे मान्य केले आहे. हा ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी मोठा पुरावा आहे. दुसऱ्या पुराव्याची गरज नाही. त्यामुळे सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा,’ अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शनिवारी केली.