पुढाऱ्यांचा आदर्श घेण्यापेक्षा कर्तुत्वान व्यक्तींचा आदर्श घ्या. राजन पाटील. भोसे येथे स्व. राजूबापू पाटील स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रतिपादन.

पुढाऱ्यांचा आदर्श घेण्यापेक्षा कर्तुत्वान व्यक्तींचा आदर्श घ्या.  राजन पाटील.  भोसे येथे स्व. राजूबापू पाटील स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रतिपादन.
Published on

BHO26B01447
भोसे (ता. पंढरपूर) : येथे स्व. राजूबापू पाटील फाऊंडेशनच्या वतीने विविध मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले. यावेळी कल्याणराव काळे, राम सातपुते, राजन पाटील, गणेश पाटील आदी.

पुढाऱ्यांपेक्षा कर्तृत्ववानांचा आदर्श घ्या
राजन पाटील : भोसे येथे स्व. राजूबापू पाटील स्मृती पुरस्कारांचे वितरण

भोसे (क), ता. १९ : निःस्वार्थीपणे समाजासाठी काम करणारी माणसे संपत्तीपेक्षा समाजाला एकत्र आणण्यासाठी धडपडत असतात. त्यांचे विचार अन् कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. पुढाऱ्यांचा आदर्श घेण्यापेक्षा कर्तृत्ववान व्यक्तींचा आदर्श घ्या. चांगल्या व्यक्तींना सहकार्य करा, अन्यथा पिढ्या बरबाद होतील, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी केले.

भोसे (ता. पंढरपूर) येथे लोकनेते स्व. राजूबापू पाटील स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार राम सातपुते, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, कमलाभवानी शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे, भोसे सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, सरपंच ॲड. गणेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब माळी आदी उपस्थित होते.

माजी आमदार राम सातपुते म्हणाले, ‘जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते, पालकमंत्री, मी स्वतः अन् रणजितसिंह शिंदे हे सर्व गणेश पाटील यांच्या पाठीशी ताकदीने उभे आहोत. त्यामुळे भविष्यात गणेश पाटील निश्चित चांगल्या पदावर जातील.’
कल्याणराव काळे यांनी स्व. राजूबापूंना जाऊन सहा वर्षे झाली असली तरी विठ्ठल परिवाराला त्यांची उणीव जाणवत असल्याची खंत व्यक्त केली.
गणेश पाटील म्हणाले, कृषी, शिक्षण, क्रीडा, सामाजिक अशा विविध क्षेत्रांत चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे. भविष्यात भाऊ अन् बापूंच्या विचाराने वाटचाल केली जाईल.
कार्यक्रमास शहाजी साळुंखे, सिद्धेश्वर पवार, अभिजित पाटील यांच्यासह विविध गावांतील संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार स्व. राजूबापू पाटील फाउंडेशनचे ॲड. बालाजी कोरके यांनी मानले.

पुरस्कारांचे मानकरी
कृषिभूषण पुरस्कार : सोमनाथ हुलगे (बेंबळे, ता. माढा)
युवा उद्योजक पुरस्कार : बाळकृष्ण टरले
शैक्षणिक पुरस्कार : महानंदा साळुंखे
क्रीडा पुरस्कार : पै. किशोर पवार - देशपातळीवरील कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com