राजुरीला एसटी थांबेना

राजुरीला एसटी थांबेना
Published on

आळेफाटा, ता. २५ : राजुरी (ता. जुन्नर) येथे आगारप्रमुखांचे आदेश असूनही लांब पल्ल्याच्या एसटी बसेस थांबत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पुन्हा एकदा कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.
राजुरीची लोकसंख्या १५ हजारांहून अधिक असून, येथे महाविद्यालये व कृषी पर्यटन केंद्रामुळे प्रवाशांची मोठी वर्दळ असते. माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, माजी सभापती दीपक औटी व सरपंच प्रिया हाडवळे यांनी परिवहनमंत्र्यांसह विविध आगारप्रमुखांकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर पारनेर, जामखेड, पाथर्डी, कल्याण, मुंबई यांसारख्या डेपोंच्या बसला येथे थांबा मंजूर करण्यात आला होता. १३ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या आंदोलनानंतर काही दिवस बस थांबल्या, मात्र आता पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे.

राजुरी या ठिकाणी बस थांबत नसल्याने येथील ग्रामस्थांना, प्रवाशांना आळेफाट्यापर्यंत तसेच बेल्हा या ठिकाणापर्यंत खासगी वाहनाने जादा पैसे देऊन जावे लागत होते. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. त्यातच राजुरी येथील ग्रामस्थ कल्याण या ठिकाणाहून एसटी बसमध्ये बसल्यानंतर त्याला राजुरी या ठिकाणी उतरायचे असेल तर पुढील बेल्हे गावाचे तिकीट फाडावे लागते व एसटी बस ही राजुरी येथील एसटी स्टॅंडवर न थांबता ती पुढे काही अंतरावर जाऊन थांंबत असल्याचे प्रकार वारंवार होत आहेत, तरी असे प्रकार थांबवावेत, तसेच या ठिकाणाहून जाणाऱ्या सर्व एसटी बसेस थांबविण्यात याव्यात, अन्यथा लवकरच कल्याण-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले जाईल.
- स्नेहल शेळके, सदस्या, माजी जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com