राजेश कणसे
आळेफाटा : राजुरी (ता.जुन्नर) येथील गावची लोकसंख्या पंधरा हजाराहुन अधिक असून या ठिकाणी दोन महाविद्यालये तसेच पराशर कृषी पर्यटन केंद्र असल्याने येथील बस स्थानकावर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. परंतु बसस्थानकावर लांब पल्ल्याच्या कुठल्याही एसटी बसेस थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी तसेच प्रवाशांनी केली नाराजी व्यक्त केली आहे.