

राख्यांनी दुकाने सजण्यास सुरुवात
सातारा, ता. १० : बहीणभावाच्या नात्यातील गोडवा जपणारा राखी पौर्णिमेचा सण आता १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे यासाठी लागणाऱ्या राख्यांची सातारा शहरातील विविध दुकानांत मोठ्या प्रमाणात आवक होण्यास सुरुवात झाली आहे. राख्यांमुळे दुकाने सजण्यास सुरुवात झाली असून, कमी वजनाच्या राख्यांना महिलांकडून जास्तीची मागणी आहे. आकारमान व बांधणीनुसार दहा ते शंभर रुपयांपर्यंतच्या राख्या विक्रीसाठी स्टॉल्सवर ठेवण्यात आल्या आहेत. राखी पौर्णिमेचा सण लक्षात शहरातील पोस्ट कार्यालयांनी देखील विशेष पाकिटे व राख्या वितरणासाठीची स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
.........
विद्यार्थ्यांमध्ये योजनांची जागृती
सातारा, ता. १० : कृष्णानगर येथील ज्ञान उदय विद्यामंदिरात अनुलोम सामाजिक संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी अनुलोम सामाजिक संस्थेच्या रूपाली पालखे उपस्थित होत्या. त्यांनी विविध शासकीय योजना, त्यांचे लाभ, बालसंगोपन शिष्यवृत्ती, अनाथ मुलींसाठीच्या योजना, शैक्षणिक कर्ज योजनांची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना देत त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
............
वंदे भारत दौडचे आयोजन
सातारा, ता. १० : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने साताऱ्यात शुक्रवारी (ता. १४) सायंकाळी सात वाजता वंदे भारत दौडचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला अखंड भारत संकल्पासाठी ही दौड होणार आहे. या दौडमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे विजय गाढवे, बजरंग दलाचे प्रसाद चिताडे, सिद्धनाथ सोनटक्के, रविराज मदने व इतर संयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.