Vidhan Sabha 2019 : टिळेकर, मोरे, बागवे, कांबळे, मिसाळ यांच्या रॅली

Vidhan Sabha 2019 : टिळेकर, मोरे, बागवे, कांबळे, मिसाळ यांच्या रॅली

विधानसभा 2019 
हडपसर

पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी हडपसर मतदारसंघातून भाजपकडून योगेश टिळेकर, मनसेकडून वसंत मोरे यांच्यासह एकूण दहा उमेदवारांनी १३ अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून चेतन तुपे हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

भाजपचे उमेदवार टिळेकर यांनी कोंढवा, गोकुळनगर भागातून रॅली काढून हडपसर येथील निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल केला. तसेच मनसेचे उमेदवार मोरे यांनीही कात्रज येथून रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोन्ही उमेदवारांनी आज शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केले. वंचित विकास आघाडीकडून घनश्‍याम हाके यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.

दाखल झालेले अर्ज  
योगेश कुंडलिक टिळेकर (भाजप), वसंत कृष्णाजी मोरे (मनसे), घनश्‍याम आनंद हाके (वंचित बहुजन आघाडी), गंगाधर विठ्ठल बधे (अपक्ष), दीपक महादेव जाधव (बसप), खंडू सतीश लोंढे (अपक्ष), राकेश हारकू वाल्मीकी (अपक्ष), ए. सईद अरकाटी (अपक्ष), ॲड. तौसिफ शेख (अपक्ष), कृपाल कृष्णराव कलुसकर (प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष)

पुणे कॅंटोन्मेंट
पुणे/ कॅंटोन्मेंट : कार्यकर्त्यांची गर्दी, शक्तिप्रदर्शन करीत पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुनील कांबळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आदींसह सात उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजप, शिवसेना आणि काँग्रेसच्या काही इच्छुकांनी या मतदारसंघातून बंडखोरी करण्याचा इशारा दिला असून, ते शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगण्यात आले. 

या मतदारसंघातून बागवे, कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे लक्ष्मण आरडे, एमआयएमच्या हीना मोमीन, ‘आप’चे खेमचंद सोनवणे, अपक्ष अमित मोरे, मोहन सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बागवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी वंदना चव्हाण, शरद रणपिसे, अनंत गाडगीळ, बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, अभय छाजेड, अविनाश बागवे उपस्थित होते. कांबळे यांनी भवानीमाता मंदिरापासून फेरी काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. दिलीप कांबळे, उमेश गायकवाड, राजेंद्र शिळीमकर, अजय मारणे, मनीषा लडकत,  आदी उपस्थित होते.

पर्वती
पुणे - भाजपच्या शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह सहा उमेदवारांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातून सणस मैदान येथील निवडणूक निर्णय अधिकारी भानुदास गायकवाड यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यातील तीन अर्ज अपक्षांचे आहेत.

‘आप’कडून संदीप सोनवणे, बहुजन समाज पक्षाच्या वतीने रवींद्र क्षीरसागर यांनी; तर परमेश्‍वर जाधव, अरविंद करमरकर आणि रोहित नारायणपेठ यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले. मिसाळ यांच्या रॅलीत खासदार गिरीश बापट, योगेश गोगावले, नगरसेवक बाळा ओसवाल, दीपक मिसाळ सहभागी झाले होते. मिसाळ यांच्या अर्जानंतर आप आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी समोरासमोर जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी कदम आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हृषीकेश नागरे-पाटील शुक्रवारी (ता. ५) अर्ज दाखल करणार आहेत.

मिसाळ यांची प्रचार रॅली निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाजवळ आली. तेव्हा खासदार गिरीश बापट आणि योगेश गोगावले यांनी १०० मीटर परिसराच्या आत सभा घेतली. त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार ‘आप’ने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com