
दौंड : नागपूर (अजनी) - पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे दौंड कॉर्ड लाइन रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यात आले. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविला. पुणे जिल्ह्यातील सोनवडी (ता. दौंड) येथील रेल्वे उड्डाण पुलाखालील दौंड कॅार्ड लाइन रेल्वे स्थानकावर रविवारी रात्री वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत करण्यात आले.