esakal | 'सकाळ' इम्पॅक्ट :...आणि 'त्या' मेंढपाळांची दिवाळी गोड झाली!
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali_Special

लाभार्थी कुटुंबांनी सकाळ माध्यम प्रतिनिधीं बरोबरच रंभा चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त दमानी कुटुंबीयांनी त्वरित मदत करून दिवाळीचा आनंद द्विगुणित केल्याची भावना व्यक्त केल्या.

'सकाळ' इम्पॅक्ट :...आणि 'त्या' मेंढपाळांची दिवाळी गोड झाली!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पिढ्यानपिढ्या स्थलांतर करणाऱ्या जनजाती आजही माळरानावर पाल ठोकून राहतात. सुगीच्या दिवसात बाहेर पडणाऱ्या मेंढपाळांची दिवाळी नक्की कशी आहे याचे विस्तृत वर्णन सकाळने मांडले होते. या बातमीची दखल घेत रंभा चॅरिटेबल ट्रस्टने त्वरित या कुटुंबांची दिवाळी गोड करण्यासाठी किराणा साहित्य आणि दिवाळी फराळ भेट दिले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मेलानियासोबत साजरी केली दिवाळी; व्हाईट हाऊस उजळले दिव्यांनी!​

ट्रस्टच्या वतीने 1 किलो बुंदीचे लाडू, 1 किलो चिवडा असा तयार दिवाळी फराळ, 10 किलो गहू, 8 किलो तांदूळ, 1 किलो हरभरा डाळ, 1 किलो मसूर डाळ, 1 किलो हरभरा, साखर दीड किलो, चहा पावडर 100 ग्रॅम, राजगिरा लाडू- 1 पॅकेट, 2 लीटर जेमिनी सोयाबीन तेल, कोरोना काळात हातांची स्वच्छता राखता यावी म्हणून 2 साबण व कपड्याचे 2 साबण अशा एकूण 13 वस्तू दिल्या असल्याचे ट्रस्ट चे सीएसआर व्यवस्थापक रणजित पुजारी यांनी सांगितले.

लाभार्थी कुटुंबांनी सकाळ माध्यम प्रतिनिधीं बरोबरच रंभा चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त दमानी कुटुंबीयांनी त्वरित मदत करून दिवाळीचा आनंद द्विगुणित केल्याची भावना व्यक्त केल्या. लाभार्थी कुटुंबामध्ये यवत येथील नामदेव कोंडीबा काळे, भागूबाई भिसे आणि सविता काळे यांचा समावेश आहे. वाटपावेळी स्वयंसेवक संतोष गोसावी, राहुल डोळस उपस्थित होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)