esakal | डोनाल्ड ट्रम्प यांनी मेलानियासोबत साजरी केली दिवाळी; व्हाईट हाऊस उजळले दिव्यांनी!
sakal

बोलून बातमी शोधा

US_Donald_Trump

यावर्षी खासकरून मित्रांनी तसेच कुटुंबीयांनी मला चांगली साथ दिली त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानू इच्छितो. अमेरिकेतील तसेच जगभरातील कोट्यवधी लोकांच्या आनंदासाठी मी प्रार्थना करतो.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मेलानियासोबत साजरी केली दिवाळी; व्हाईट हाऊस उजळले दिव्यांनी!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्यासमवेत शनिवारी (ता.१०) व्हाईट हाऊस येथे दिवाळी साजरी केली. दीप प्रज्वलन करत त्यांनी सर्वांना प्रकाश पर्वाच्या शुभेच्छा दिल्या. 

पावसामध्ये आहे एका डोंगराला दुसरीकडे हलवण्याची शक्ती​

व्हाईट हाऊसकडून जारी केलेल्या निवेदनात अध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, "द फर्स्ट लेडी (मेलानिया ट्रम्प) आणि माझ्याकडून दिवाळी साजरा करणाऱ्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. प्रकाश पर्वाच्या या उत्सवात मित्र, शेजारी आणि प्रिय माणसे सामील होतात. वाईटावर चांगल्याचा विजय, अंधारावर प्रकाशाचा विजय आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय म्हणजेच खरी दिवाळी. या उत्सवानिमित्ताने घर, कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी आणि उपासना स्थळांवर दिवे लावले जातात. विश्वास आणि परंपरा हा आपल्या जीवनाचा मुख्य गाभा आहेत. याची आठवण हा उत्सव करून देतो."

2020 पेक्षाही 2021 वर्ष वाईट असेल; WPF च्या अध्यक्षांनी केलं सावध  

डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले, ''युनायडेट स्टेस्ट ऑप अमेरिका हे एक विश्वासार्ह राष्ट्र आहे आणि माझ्या प्रशासनाच्या कामाचा मला अभिमान आहे. जो सर्व अमेरिकन लोकांच्या घटनात्मक अधिकाराचे रक्षण करतो आणि त्यांचे रक्षण करतो. अमेरिकन नागरिक जिथे जिथे दिवाळी साजरी करण्यासाठी दीप प्रज्वलित करीत आहेत, तिथे आपले राष्ट्र सर्व लोकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून चमकत राहिल."

यावर्षी खासकरून मित्रांनी तसेच कुटुंबीयांनी मला चांगली साथ दिली त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानू इच्छितो. अमेरिकेतील तसेच जगभरातील कोट्यवधी लोकांच्या आनंदासाठी मी प्रार्थना करतो. तसेच या उत्सवाच्या आणि नवी सुरवात करण्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

जो बायडन- कमला हॅरिस यांनी दिल्या दिवाळीच्या सदिच्छा​

हिंदू धर्मानुसार, या दिवशी भगवान श्रीराम हे रावणाला पराभूत करत तसेच वनवासाची १४ वर्षे पूर्ण करत अयोध्येत परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्येत दिवे लावले होते. तेव्हापासून देशभरातील तमाम लोक कार्तिक अमावस्येच्या दिवशी दिवाळी साजरी करतात. आणि दिवाळी ही असत्यावर सत्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक मानली जाते.

- जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)