

Bail Granted to MCOCA Accused Nilesh Arte in Ramdas Akhade Murder Case
Sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : हॉटेल व्यवसायाच्या स्पर्धेतून उरुळी कांचन (ता. हवेली)येथील प्रसिद्ध गारवा हॉटेलचे मालक रामदास रघुनाथ आखाडे यांच्या खून प्रकरणातील मोक्का आरोपी नीलेश मधुकर आरते याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.रायते याच्यावर लोणीकाळभोर व हडपसर पोलिस ठाण्यात एकूण २१ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून गेली पाच वर्षे तो मोक्का अंतर्गत जेरबंद होता. न्यायालयाने आरतेला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजुर केला आहे.आरोपी निलेश आरतेला जामीन मंजूर झाल्यानंतर या गुन्ह्यातील मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केले असून या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळासाहेब खेडेकर याचा कारागृहातच मृत्यू झाला होता.