ramdas athawale
sakal
पुणे: ‘‘सामान्य नागरिकाला त्याचे हक्क, तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील सरकार कटिबद्ध आहे. मात्र, महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील प्रेम बाजूला ठेवावे लागले आहे. त्यांच्याबद्दल आमच्या मनात प्रेम आहे. परंतु, या निवडणुकीत नाही. निवडणूक संपल्यानंतर आमचे पुन्हा जमणार आहे,’’ अशी मिश्कील टिप्पणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी केली.