भाजपला पूर्व हवेलीत पुन्हा खिंडार...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 June 2020

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रामदास दाभाडे यांनी पुन्हा केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश 

वाघोली (पुणे) : राष्ट्रवादीचे कट्टर असलेले रामदास दाभाडे पाच वर्षांपूर्वी भाजपमध्ये गेले होते. यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनच लढविली होती. माजी आमदार विलास लांडे यांचे ते खंदेसमर्थक होते. आमदार विलास लांडे, रामदास दाभाडे, प्रदीप कंद हे त्रिकूट होते. या माध्यमातून त्यांनी भरपूर विकास कामे केली. वाघोली हा भाग शिरूर विधानसभा मतदार संघात नंतर जोडला गेला. राष्ट्रवादीबाबत नाराज झाल्याने दाभाडे यांनी भाजपची वाट धरली होती. मात्र, तेथे त्यांचे सूत जुळले नाही.

अजितदादांकडून पवारसाहेबांसमोरच भाजपच्या महापौरांचे कौतुक...  

दरम्यानच्या काळात विधानसभेचे तिकीट नाकारल्याने प्रदीप कंद यांनीही राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपची वाट धरली. दाभाडे हे जरी भाजपमध्ये होते तरी त्यांनी स्थानिक विकास कामासाठी पक्षभेद न करता सतत प्रयत्न केले. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते झटत असतात. दाभाडे यांच्या प्रवेशाने आमदार अशोक पवार यांचीही ताकद पूर्व हवेलीत वाढणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी आमदार अशोक पवार, जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी सरपंच शिवदास उबाळे उपस्थित होते. दाभाडे यांच्या प्रवेशानंतर अनेक कार्यकर्तेही पुन्हा राष्ट्रवादीत परततील हे नक्कीच.

शरद पवारांनी खडसावल्यानंतर अजित पवार म्हणाले...

दाभाडे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने चांगला फायदा होईल. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी ते पुन्हा नक्कीच काम करतील. अजून अनेक जण राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक आहेत. येत्या काही दिवसात खूप बदल दिसून येतील.

- अशोक पवार, आमदार. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramdas Dabhade rejoined the NCP