पुणे : वाघोलीत रमजान ईद उत्साहात साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रमजान ईद निमित्त एकत्रित नमाज पठण करताना मुस्लिम बांधव.

पुणे : वाघोलीत रमजान ईद उत्साहात साजरी

वाघोली: वाघोली परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी झाली. सुमारे दोन हजार पेक्षा अधिक मुस्लिम बांधवानी एकत्रित नमाज पठण केले. गळा भेट घेऊन एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. येथील अभिषेक मंगल कार्यालयात एकत्रित नमाज पठणचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके, रामदास दाभाडे, शांताराम कटके, चाचा जाधवराव, संग्राम जाधवराव, शिवदास उबाळे, शनी शिंगारे आदींनी उपस्तीत राहून ईदच्या शुभेच्छा दिल्या. मुस्लिम बांधवांचे सामाजिक प्रश्न सोडविण्याचे आश्वासन यावेळी उपस्तीत लोकप्रतिनिधींनी दिले.

मुस्लिम वेल्फेर अससोसिएशनचे अध्यक्ष जान महंमद पठाण यांनी गुलाब पुष्प देऊन उपस्तितांचा सत्कार केला. यानंतर एकत्रित नमाज पठण करण्यात आले. नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवानी एकमेकांची गळा भेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. सायंकाळी शिरखुरमा पार्ट्या रंगल्या होत्या. आप्तेष्ट,नातेवाईक, मित्र यांनी मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन शिरखुरम्याचा आनंद लुटला. ईद साठी झालेली गर्दी लक्षात घेता वाघेश्वर मंदिर चौक ते लोहगाव चौकापर्यंत रस्ता बंद करण्यात आला होता. लोणीकंद पोलीसांनीही कडक बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Ramjan Eid Wagholi Celebrates

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top