

esakal
बारामती: राणा शिपिंग कंपनीचे प्रमुख राणा सूर्यवंशी यांच्यावर रविवारी (ता. 18) बारामती विमानतळानजिक गोळीबार झाल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान हल्लेखोऱाने मारलेली गोळी त्यांना लागली नसून त्या नंतर धारदार हत्याराने हल्ला केल्याने त्यांच्या हाताला जखम झाली आहे. पुढील उपचारार्थ त्यांना पुण्याला हलविण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांनी दिली.