

Coins of Shivkal, Mughal and Portuguese Era in One Man’s Collection
Sakal
-संदीप सोनार
काळेवाडी : रहाटणी येथील ज्येष्ठ नागरिक रणछोडदास परमानंद भुतडा हे जुन्या नाण्यांचा इतिहास जपण्याचा अनोखा छंद जोपासत तरुणांसमोर प्रेरणादायी आदर्श ठेवत आहेत. जुन्या चलनी नोटा, नाण्यांचे संग्रह करून ते केवळ आठवणी नव्हे, तर देशाच्या आर्थिक आणि सांस्कृतिक प्रवासाची जपणूक करत आहेत. शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन ते विद्यार्थ्यांना आपला संग्रह दाखवून त्याबद्दल माहितीही देत असतात.