esakal | राणी सईबाईची समाधी पर्यटन स्थळ जाहीर करणार - रामराजे निंबाळकर
sakal

बोलून बातमी शोधा

राणी सईबाईची समाधी पर्यटन स्थळ जाहीर करणार - रामराजे निंबाळकर

राणी सईबाईची समाधी पर्यटन स्थळ जाहीर करणार - रामराजे निंबाळकर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वेल्हे : स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या किल्ले राजगडाच्या पायथ्याशी पाल बुद्रुक (ता. वेल्हे) येथे राणी सईबाई चे समाधी स्थळ पर्यटन स्थळ म्हणून जाहीर करणार असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी केले.

रविवार (ता.५) रोजी राजगड किल्ले पायथ्याशी स्वराज्याच्या राणीसाहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती. छत्रपती संभाजी यांच्या मातोश्री पाच सप्टेंबर १६५९ रोजी आपल्या लाडक्या शंभूराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना व सर्व रयतेला सोडून वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी निधन पावल्या यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो शिवभक्त येथे जमा झाले होते.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते बोलताना ते पुढे म्हणाले की, राणी सईबाई त्या शूर नाईक-निंबाळकर यांच्या घराण्यातील मुधोजीराजे नाईक-निंबाळकर यांच्या पोटी सईबाई राणीसाहेबांचा जन्म झाला होता. फलटणचे नाईक-निंबाळकर घराणे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक घराणे होय. त्यांची सोयरीक कायमच भोसले घराण्याशी होत राहिल्याने राजकीय व सामाजिकदृष्ट्या हे घराणे फार महत्त्वाचे मानले गेले.

एका हिंदवी सम्राटाची पत्नी व एका छाव्याची आई म्हणून महाराष्ट्र वारंवार ज्यांची सय (आठवण) काढेल, त्या म्हणजे सईबाई राणीसाहेब. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी सईबाई राणीसाहेब म्हणजे . शिवछत्रपतींना मिळालेल्या यशाचे बरेचसे श्रेय जिजामातेच्या शिकवणीकडे व मार्गदर्शनाकडे जाते. तेवढेच श्रेय सईबाई राणीसाहेब यांच्या त्यागाकडे जाते. सईबाई राणीसाहेब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सखी, गृहिणी, सचिव व प्रिया होत्या. सईबाई राणीसाहेबांनी छत्रपती शिवाजीराजांना एकोणीस वर्षे अत्यंत समर्थपणे साथ दिली.

अशा या सईबाई राणीच्या समाधी स्थळाची दुरवस्था झाली आहे परंतु एका वर्षातच या समाधी स्थळ व्यवस्थित बांधून या स्थळाला पर्यटनाचा दर्जा देणार असल्याचे यावेळी निंबाळकर यांनी सांगितले. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव निंबाळकर,हेमंतराजे निंबाळकर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद देशमाने,बापू धुमाळ, शिववसेनेचे कुलदीप कोंडे ,राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष शंकरराव भुरुक , प्रदीप मरळ, सह्याद्री प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष गणेश खुटवड ,शिवशंभु प्रतिष्ठान चे अध्यक्ष महेश कदम ,दामोदर मगदूम,सचिन खोपडे , करणसिंह बांदल ,बाळासाहेब सणस, सरपंच गोरक्ष शिर्के आदींसह शिवप्रेमी उपस्थित होते .

loading image
go to top