

Ranjangaon Attack Over Angry Stares Two Workers Attacked With Sickle Fist And Sticks Six Adults And Two Minors Held
sakal
शिरूर : रागाने बघून खुन्नस दिल्याच्या कारणावरून कामगारांच्या दोन गटांत झालेल्या झालेल्या बाचाबाचीचे पर्यावसान दोघांवर जीवघेणा हल्ला करण्यात झाले. वाईन शॉप मध्ये काम करणाऱ्या दोघांवर नऊ ते दहा जणांनी कोयता, फायटर, लाठ्या - काठ्यांनी व दगडाने बेदम मारहाण केली. रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील एका परमिट रूम समोर काल पहाटे झालेल्या या थरारक हल्ल्याच्या प्रकाराने परीसरात घबराट पसरली.