विनयभंग व जिवे मारण्याची धमकी देत आरोपीकडून पुन्हा बलात्काराचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

पेरणे फाटा येथे कर्जाच्या पैशांच्या कारणातून विवाहितेवर बलात्कार व गर्भपाताच्या धक्कादायक घटनेत लोणीकंद पोलिसांकडून दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामिनावर असताना पुन्हा पीडितेच्या घरी जाऊन गुन्हा मागे घेण्यासाठी दमदाटी, विनयभंग व जिवे मारण्याची धमकी देत बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या घटनेत शिक्रापूर पोलिसांनी राहुल वाळके यास आज अटक केली.

कोरेगाव भीमा - पेरणे फाटा येथे कर्जाच्या पैशांच्या कारणातून विवाहितेवर बलात्कार व गर्भपाताच्या धक्कादायक घटनेत लोणीकंद पोलिसांकडून दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामिनावर असताना पुन्हा पीडितेच्या घरी जाऊन गुन्हा मागे घेण्यासाठी दमदाटी, विनयभंग व जिवे मारण्याची धमकी देत बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या घटनेत शिक्रापूर पोलिसांनी राहुल वाळके यास आज अटक केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पेरणे फाटा (ता. हवेली) येथे पीडितेच्या पतीने आर्थिक अडचणींमुळे गावातील राहुल वाळके याच्याकडून उसने पैसे घेतले होते. ते देऊ न शकल्याने राहुलने िपडीतेवर दहशत निर्माण करून अत्याचार केले. त्यानंतर त्याने वेळोवेळी महिलेवर अत्याचार केला. तसेच आरोपीने यादरम्यान महिलेवर दहशत निर्माण करत पतीच्या खोट्या सह्या करून जबरदस्तीने गर्भपात केला. या अत्याचारास कंटाळून महिलेने त्याच्याविरोधात लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणात आरोपी राहुलने उच्च न्यायालयाकडून जामीन मिळवला. तो जामिनावर बाहेर असताना त्याने महिलेच्या घरी जाऊन माझ्याविरुद्ध दिलेली तक्रार मागे घे, असे म्हणत महिलेस मारहाण करत पुन्हा अत्याचाराचा प्रयत्न केला. याबाबत महिलेने शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

भारताचे 4 अवकाशवीर प्रशिक्षणासाठी रशियाला रवाना

त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी राहुल संजय वाळके (रा. पेरणे, ता. हवेली) याच्याविरुद्ध विनयभंग, बलात्काराचा प्रयत्न, मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rape attempt by the accused to disobey and threaten to kill again