esakal | अक्षय बोऱ्हाडे याच्यावर बलात्काराचा गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

अक्षय बोऱ्हाडे याच्यावर बलात्काराचा गुन्हा

अक्षय बोऱ्हाडे याच्यावर बलात्काराचा गुन्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आपटाळे : स्वतःला समाजसेवक म्हणवून मिरविणाऱ्या जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथील शिवऋण युवा प्रतिष्ठानचा अध्यक्ष अक्षय मोहन बोऱ्हाडे याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा जुन्नर पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.

अक्षय बोऱ्हाडे याने एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून नोव्हेंबर २०१९ ते डिसेंबर २०१९ या दरम्यान जुन्नर शहरातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला. तर त्याचे मित्र सोनू आणि रोशन (पूर्ण नाव माहिती नाही) यांनी शिवीगाळ व दमदाटी केली.

याप्रकरणी या तिघांवर जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अक्षय याच्यावर यापूर्वीच खंडणी, पत्नीला व कामगाराला मारहाण केल्याप्रकरणी ३ गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे तो १ सप्टेंबरपासून पोलिस कोठडीत आहेत. याबाबत अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन शिंदे हे करीत आहेत.

loading image
go to top