esakal | पुणे रेल्वे स्थानकावरील सरकता जिना नामशेष ! प्रवाशांची गैरसोय, रॅम्पही बंद
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे रेल्वे स्थानकावरील सरकता जिना नामशेष !

पुणे रेल्वे स्थानकावरील सरकता जिना नामशेष !

sakal_logo
By
मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात सुमारे २६ वर्षांपूर्वी बसविण्यात आलेला सरकता जिना (एक्सलेटर) रेल्वे प्रशासनाने दोन दिवसांपासून काढून टाकला. त्यातच हेरीटेज बिल्डिंगशेजारील रॅम्प अद्याप बंद ठेवण्यात आल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यांना वळसा घालून प्लॅटफॉर्मवर जावे लागत आहे.

रेल्वेने १९९५ मध्ये पहिला सरकता जिना पुणे रेल्वे स्थानकावर बसविला. सुरवातीच्या काळात हा सरकता जिना प्रवाशांसाठी आकर्षणाचा विषय होता. मात्र, त्यानंतर अनेकदा तो बंद पडत गेला. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी रेल्वेच्या विद्युत विभागाने तो काढून टाकला. ज्या जिन्याच्या शेजारी पादचारी पूल आहे. त्यावर रॅम्प आहे. त्यामुळे प्रवासी त्यांच्या बॅगा ओढत घेवून जावू शकत होते. मात्र, कोरोनाचा लॉकडॉऊन सुरू झाल्यापासून हा रॅम्प प्रवाशांसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी प्रवाशांना वळसा घालून अन्य ठिकाणांवरून जावे लागते. स्थानकाच्या मागील बाजूस आणि आक्षण केंद्राजवळील दोन सरकते जिने सुरू आहेत. परंतु, जुना सरकता जिना आणि रॅम्प हा स्थानकाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे तेथे पोचल्यावर प्रवाशांना रेल्वेच्या डब्‍यात बसण्यासाठी कोठे जायचे, हे समजते. परंतु, आता सुरू असलेले सरकते जिने गैरसोयीचे आहेत. त्यातच रॅम्ब बंद असल्यामुळेही प्रवाशांची गैरसोय वाढली आहे. आरक्षण केंद्र आणि डीआरएम ऑफिसजवळील सरकते जिने वारंवार बंद असतात, असेही प्रवाशांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: चिमुकलीचा इशारा अन् गुंड सोन्या धोत्रे पोलिसांच्या जाळ्यात!

‘‘रेल्वेने जुन्या सरकत्या जिन्याची योग्य प्रकारे देखभाल दुरुस्ती केली नाही. त्यामुळे तो बंद पडला. तसेच हेरिटेज बिल्डिंग शेजारील रॅम्प प्रवाशांना सोयीचा असून तो बंद ठेवण्याचे कारण काय ? प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ वर चढण्यासाठी सरकता जिना आहे. परंतु, उतरण्यासाठी नाही. प्लॅटफॉर्म क्रमांक ४, ५, ६ साठी सरकता जिना प्रवाशांच्या सोयीसाठी नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन रेल्वेने तातडीने बदल करणे गरजेचे आहे.’’

- हर्षा शहा (अध्यक्ष - रेल्वे प्रवासी ग्रूप)

''जुन्या सरकत्या जिन्याचे आयुर्मान संपल्यामुळे तो बंद काढून टाकण्यात आला आहे. आता दोन सरकते जिने आहेत. त्यांचा वापर प्रवासी करीत आहेत. तसेच पादचारी पूलही प्रवाशांसाठी खुले कऱण्यात आले आहेत. रॅम्पबाबतही लवकरच निर्णय होईल.''

- मनोज झंवर (जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग रेल्वे)

हेही वाचा: सासवडला मजुराचा खून अखेर उघडकीस; नेपाळी दारू पार्टनरला अटक

loading image