इंस्टाग्रामवरील मैत्रीनंतर अल्पवयीन मुलीवर बलात्कार; गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर बलात्कार
अल्पवयीन मुलीवर बलात्कारSakal

पुणे : सोशल मीडियावरून अनोळखी लोकांशी संपर्क होणं फार सोप झालं आहे. मात्र याचे अनेक दुष्पपरिणाम समोर येत असून महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहे. अशीच एक घटना समोर आली असून येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्रामवर (Instagram) एका तरुणाशी ओळख झाली होती. या ओळखीतून अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे. (Rape on minor girl FIR register)

अल्पवयीन मुलीवर बलात्कार
पुणे पोलिसांनी आनंद दवेंच्या सुरक्षेची काळजी घ्यावी; राऊतांचे ट्वीट

दरम्यान इन्स्टाग्रामवर दोघांची ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र आरोपी तरुणाने तरुणीची इच्छा नसतानाही तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यातूनही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहन मनूदास असे आरोपीचे नाव आहे. जानेवारी 2022 मध्ये इंस्टाग्रामवर आरोपी मनुदास याच्यासोबत पीडितेची ओळख झाली होती. त्यानंतर झालेल्या शारिरक संबंधातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली, तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com