पुणे पोलिसांनी आनंद दवेंच्या सुरक्षेची काळजी घ्यावी; राऊतांचे ट्वीट

पुणे पोलिसांनी आनंद दवेंच्या सुरक्षेची काळजी घ्यावी; राऊतांचे ट्वीट

पुणे : ब्राम्हण महासंघाचे नेते, कडवट हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवे (Anand Dave) यांच्या जिवितास धोका असल्याचे केंद्रीय तपास यंत्रणानी महाराष्ट्र पोलिसांना कळवले आहे. त्यामुळे उदयपूरप्रमाणे (Udipur) काही पुण्यात घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) आनंद दवे यांची काळजी घ्यावी, असे ट्वीट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. (Sanjay Raut Tweet For Anand Dave)

काही दिवसांपूर्वी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांचे समर्थन करणाऱ्या उदयपूर येथील कन्हय्यालाल आणि अमरावती येथील उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे देशासह राज्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पुणे पोलिसांनी आनंद दवेंच्या सुरक्षेची काळजी घ्यावी; राऊतांचे ट्वीट
Amravati Chemist Murder Case: सातही आरोपींचा ताबा एनआयए घेणार

त्यानंतर आता ब्राम्हण महासंघाचे नेते, कडवट हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवे यांच्या जिवितास धोका असल्याचे केंद्रीय तपास यंत्रणानी महाराष्ट्र पोलिसांना कळवले आहे. त्यामुळे पोलीस सतर्क झाले असून, केंद्राच्या या सूचनेनंतर पोलिसांनी दवे यांचे कार्यालय, घर आणि हिंदू महासंघ कार्यालयास सशस्त्र पोलीस संरक्षण दिले आहे. या सर्व घडामोडींमध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उदयपूरप्रमाणे काही पुण्यात घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी आनंद दवे यांची काळजी घ्यावी, असे ट्वीट करत लक्ष वेधले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com