esakal | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार
sakal

बोलून बातमी शोधा

RAPE

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : मनुष्यबळ व्यवस्थापकाने विवाहीत असल्याचे लपवून, आपल्याच कंपनीतील कर्मचारी तरुणीला (Young Woman) लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार (Rape) केला. तरुणीने लग्नाची मागणी केल्यानंतर त्याने तिला धमकाविण्यास सुरवात केली. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. (Rape young woman by showing promise marriage crime)

नीलेश अरविंद मोरे (वय ३१, सध्या रा. हडपसर, मुळ रा. सोनवडी सुपे, बारामती) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी २७ वर्षीय तरुणीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या शिक्षण घेत असतानाच स्वतः इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करीत होत्या. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची मोरे समवेत ओळख झाली. त्यानंतर त्याने फिर्यादीशी ओळख वाढवून, त्यांचा विश्‍वास संपादन केला. आपण अविवाहित असल्याचे सांगून फिर्यादीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

हेही वाचा: पूनर्वसन प्रस्ताव तयार; लवकरच नवीन ठिकाणी वसणार तळीये गाव

त्यानंतर त्याने फिर्यादीला तो काम करीत असलेल्या कंपनीमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीवर बलात्कार केला. त्यानंतर वेळोवेळी फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. फिर्यादीने त्याच्याकडे लग्नाची मागणी केली. मात्र, तो लग्नाला टाळाटाळ करीत होता. त्याचवेळी मोरे हा विवाहीत असल्याची माहिती फिर्यादीस मिळाली. त्याविषयी फिर्यादीने त्यास विचारणा केल्यानंतर, त्याने फिर्यादीस धमकाविण्यास सुरवात केली.

loading image
go to top