esakal | पूनर्वसन प्रस्ताव तयार; लवकरच नवीन ठिकाणी वसणार तळीये गाव
sakal

बोलून बातमी शोधा

mahad landslide

पूनर्वसन प्रस्ताव तयार; लवकरच नवीन ठिकाणी वसणार तळीये गाव

sakal_logo
By
अमित उजागरे

महाड - दरड कोसळल्यानं उद्ध्वस्त झालेल्या तळीये गावातील ग्रामस्थांचं सुरक्षित जागी पूनर्वसन करण्याचा प्रस्ताव तयार असून लवकरच ६० घरांचं पुनर्वसन नवीन जागी केलं जाईल, अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी येथे दिली. त्याचबरोबर महाड सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी ५० लाख रुपयांचा निधी देण्याचीही घोषणा त्यांनी केली.

हेही वाचा: भाजप खासदार बाबूल सुप्रियो यांचा राजकारणाला 'अलविदा'

महाडमध्ये झालेल्या प्रलयकारी पावसामुळं तळीये गावात दरड कोसळून त्यात ८५ जणांचा मृत्यू झाला तर अखं गावचं या दुर्घटनेत उद्ध्वस्त झालं. त्यानंतर डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या गावांचे पूनर्वसन करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. पुण्यातील आंबेगाव येथील माळीण गावाप्रमाणेच तळीयेचं देखील लवकरात लवकर पूनर्वसन करण्याची मागणी होत होती.

हेही वाचा: HSC RESULT : निकाल लांबणीवर पडल्याने लाखो विद्यार्थ्यांना फटका!

तळीये दुर्घटना घडली त्याच डोंगराच्या दुसरीकडील भागाला देखील भेगा पडल्या असल्याची माहिती ग्रामस्थांनी शिंदे यांना दिली. ही भेग तीन किलोमीटरपर्यंत लांब असल्याने या कड्याच्या पायथ्याशी असलेल्या शिंदे आवड, कुम्हण अळी, खालचे आवाड, मधले आवाड आणि तळीये म्हणजेच कोंडाळकर आवाड अशा पाच वाड्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून नक्की सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

महाड कोर्टाच्या दुरुस्तीसाठी ५० लाखांचा निधी

महाड मधील सत्र न्यायालयाच्या इमारतीचे देखील या दरड दुर्घटनेत अतोनात नुकसान झाले आहे. पुरामुळे नदीलगतची कोर्टाची इमारत पाण्याखाली गेल्याने आतील दालने व फर्निचरचे नुकसान झाले आहे. कोर्टातील कागदपत्रेही पाण्याखाली गेली होती. शिंदे यांनी शनिवारी या इमारतीला भेट देऊन पाहाणी केली. खराब झालेल्या गोष्टींची लवकरात लवकर दुरुस्ती करून इमारतीतून कामकाजाला पुन्हा सुरुवात व्हावी, यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून ५० लाख रुपयांचा विशेष निधी देण्याची घोषणा शिंदे यांनी यावेळी केली.

loading image
go to top