Wildlife Rescue : टाकवे गावात आढळला दुर्मीळ बॉम्बे सॅसीलियन, वन्यजीव रक्षकांचा यशस्वी बचाव
Bombay Caecilian : मावळ तालुक्यातील टाकवे गावात दुर्मीळ बॉम्बे सॅसीलियनचा यशस्वी बचाव करण्यात आला; स्थानिक वन्यजीव रक्षकांनी निसर्गात सुरक्षितपणे सोडले.
तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील टाकवे गावात सरपटणारा एक दुर्मीळ उभयचर प्राणी आढळला. स्थानिक वन्यजीव रक्षक आणि पर्यावरणप्रेमींच्या तत्परतेमुळे त्याचा यशस्वी बचाव करण्यात आला.