

Farmers received hands-on training on traditional rice cultivation techniques with support from the Maharashtra Gene Bank and agricultural experts.
Sakal
मंचर : देशी भात वाणांचे संवर्धन, जैवविविधतेचे जतन आणि शाश्वत शेतीला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र जीन बँक, नागपूर यांच्या सहकार्याने ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेच्या वतीने आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात देशी भात वाणांच्या लागवडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. मंगळवारी (ता. २१) व बुधवारी (ता. २२) झालेल्या या उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.