police officer suspended
sakal
पुणे - रजेवर असताना पोलिस गणवेशात विरुध्द दिशेने भरधाव मोटार चालवून वाहतूक नियमाचे उल्लंघन आणि नागरिकांना शिवीगाळ करणाऱ्या महिला पोलिस हवालदारास शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. काळेपडळ पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या पोलिस हवालदार अश्विनी केकान यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.