

Possibility of United NCP in Pune Municipal Elections
Sakal
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्रित आल्यास आपण राजकारण सोडू, असे विधान करणाऱ्या शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याची चर्चा एकीकडे जोरात सुरू आहे, तर दुसरीकडे जगताप यांनी राजीनामा दिला नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मंगळवारी "सकाळ" शी बोलताना स्पष्ट केले. तर "महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत पक्षात दोन मतप्रवाह आहेत, मात्र मतप्रवाहापेक्षा पक्षाचे हित देखील महत्त्वाचे आहे.