जनावरेही खाणार नाहीत असे धान्य नको...; शिधापत्रिकाधारकांचा संताप

पुणे शहरातील बहुतांश रेशन दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना सध्या खराब निकृष्ट दर्जाचा गहू दिला जात आहे.
Wheat
WheatSakal

पुणे - शहरातील बहुतांश रेशन दुकानांमधून (Ration Shop) शिधापत्रिकाधारकांना सध्या खराब निकृष्ट दर्जाचा गहू (Bad Wheat) दिला जात आहे. मोफतचे धान्य वितरित करण्याच्या नावाखाली सरकारकडून आम्हाला निकृष्ट धान्य नको, अशी संतप्त भावना शिधापत्रिकाधारकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारमार्फत पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य वितरित करण्यात येत आहे. अंत्योदय आणि प्राधान्यक्रम कुटुंबातील कार्डधारकांना दिवाळीपर्यंत गहू, तांदूळ मोफत वितरित करण्यात येणार आहे. हे मोफतचे धान्य वगळता रेशनवर नियमित गहू प्रतिव्यक्ती तीन किलो आणि तांदूळ दोन किलो वितरित करण्यात येतो. परंतु जनावरेही खाणार नाहीत, असे धान्य दिले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

काही रेशन दुकान दुकानदार आणि किराणा दुकान एकत्रितपणे चालवितात. त्यापैकी काही रेशन दुकानांमध्ये खराब गहू दिला जात आहे. याबाबतही अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. तसेच, रेशन दुकानांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी शिधापत्रिकाधारकांनी केली आहे. या संदर्भात अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

Wheat
लग्नास नकार दिल्याने तरुणीचे व्हिडीओ फेसबुकवर टाकून बदनामी

पर्वती येथील एका रेशन दुकानदाराकडून उर्मट वागणूक दिली जाते. रेशनवर कधीच चांगले धान्य मिळत नाही. घरात दोन महिन्यांचा रेशनवरील गहू पडून असून, तो खाण्यालायक नाही. याबाबत बऱ्याच तक्रारी करूनही काहीच फरक पडत नाही. अशा रेशन दुकानदाराचा परवाना रद्द करावा.

- सुनील मयेकर, शिधापत्रिकाधारक

रेशनवर निकृष्ट दर्जाच्या धान्यामुळे ग्राहकांसोबत दररोज वाद होत आहेत. वाहतूक ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाचा गहू आणि तांदूळ दिला जात आहे. अन्नधान्य वितरण विभागाकडून नेमलेल्या अधिकाऱ्यांनी गोदामातून चांगल्या दर्जाचे धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न करावेत. तसेच, रेशनचे धान्य किराणा दुकानात ठेवले तर ते लगेच लक्षात येईल. रेशनचा गहू कोणीही किराणा दुकानात ठेवत नाही.

- गणेश डांगी, अध्यक्ष- रेशन दुकानदार संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com