

KOP26O46369 - रौनक आडगुळे
माजी महापौरांच्या नातवाची आत्महत्या
मृत बारावीचा विद्यार्थी; घरात घेतला गळफास, कारण अस्पष्ट
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः बारावीमध्ये शिकणाऱ्या रौनक इंद्रजित आडगुळे (वय १७, रा. सोन्या मारुती चौक) याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी सहाच्या सुमारास त्याने किचनमध्ये गळफास घेतल्याचे कुटुंबीयांनी पाहिले. फास सोडवून त्याला तातडीने सीपीआरमध्ये आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रौनक माजी महापौर ॲड. महादेवराव आडगुळे यांचा नातू होता.
याबाबत लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ॲड. आडगुळे मुलगा इंद्रजित, सून, नातवंडांसोबत सोन्या मारुती चौकात राहण्यास आहेत. ते सकाळी दुसऱ्या मजल्यावरील किचनमध्ये पाणी आणण्यासाठी गेले असताना रौनकने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी मुलाला बोलावून ओढणीने घेतलेला फास कापून त्याला सोडविले. त्याला बेशुद्धावस्थेत सीपीआरमध्ये आणले. मात्र, उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
उत्तरीय तपासणी करून रौनकचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. यानंतर दुपारी बाराच्या सुमारास सोन्या मारुती चौकातील घरातून अंत्ययात्रा निघाली. यावेळी राजकीय, सामाजिक, वकिली क्षेत्रातील अनेक जण सहभागी झाले होते. पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुटुंबीयांना धक्का
रौनकच्या मृत्यूने त्याच्या आई-वडील, आजोबा यांना मानसिक धक्का बसला आहे. रौनक आजोबांचीही नेहमी काळजी घेत होता. मंगळवारी सायंकाळी आजोबांना काही औषधेही त्याने आणून दिल्याचे शेजारी सांगत होते. रौनकच्या मित्रांनाही अश्रू अनावर झाले होते.
चौकट
मोबाईलमधून माहिती घेण्याचे काम...
रौनकच्या आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. लक्ष्मीपुरी पोलिसांनी त्याचा मोबाईल ताब्यात घेतला; परंतु मोबाईल लॉक असल्याने पुढील तपासासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.