पुणे : उंब्रजमधील राऊत दांपत्याने वाचविले ५,४०० जणांचे प्राण

डॉ. सदानंद राऊत आणि त्यांची पत्नी पल्लवी हे दांपत्य जिल्ह्यातील सर्पदंश झालेल्या आदिवासी तसेच शेतकरी बांधवांचे प्राण वाचविणारे देवदूत बनले आहे.
Snake Bite
Snake BiteSakal

पुणे - उंब्रज (ता. जुन्नर) (Umbraj) येथील डॉ. सदानंद राऊत (Dr Sadanand Raut) आणि त्यांची पत्नी पल्लवी (Pallavi) हे दांपत्य जिल्ह्यातील सर्पदंश (Snake Bite) झालेल्या आदिवासी तसेच शेतकरी (Farmer) बांधवांचे प्राण वाचविणारे (Life Saving) देवदूत बनले आहे. सामाजिक भावनेतून त्यांनी आतापर्यंत ५,४०० जणांचे प्राण वाचविले आहेत. सर्पदंशाचा दर शून्य येण्यासाठी त्यांनी ‘शून्य सर्पदंश मृत्यूदर प्रकल्प’ राज्यभर राबविला आहे. त्याद्वारे ते मागील तीस वर्षांपासून सर्पदंशामुळे होणारे मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने सर्पदंश नियंत्रण व प्रतिबंध व्यवस्थापन तज्ज्ञांच्या समितीवर मृत्यूदर कमी करण्यासाठी डॉ. राऊत यांची सर्पदंश समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. देशातील सुमारे २७० प्रकारच्या विषारी व निमविषारी सापांबद्दल गैरसमज दूर करणे तसेच सर्पदंश झाल्यानंतर कोणती काळजी घ्यावी यासाठी राऊत दांपत्य आदिवासी वाडी-वस्ती, शाळा कॉलेजमध्ये व्याख्यानांद्वारे जनजागृती अभियान राबवीत असते. त्यांनी विकसित केलेल्या सर्पदंश उपचार पद्धतीची देश तसेच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे प्रो. इमगेरीटस, डॉ. डेव्हिड यॉरेल यांनी दखल घेतली आहे. डॉ. सदानंद राऊत यांनी आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, नेपाळ, सह्याद्री वाहिनीवर व्याख्याने देवून सर्पदंशाबाबत प्रबोधन केले आहे. राऊत दांपत्यांचा शिवनेरी भूषणसह अनेक पुरस्काराने मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे.

Snake Bite
येरवडा, नगर रस्ता भागात मोठी अतिक्रमण कारवाई; चौदा ट्रक माल जप्त

जागतिक आरोग्य संघटनेने २०३० पर्यंत सर्पदशांचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी आम्ही ‘शून्य सर्पदंश मृत्यूदर प्रकल्प’द्वारे तळागाळात पोचून नागरिकांमध्ये जागृती करत असतो. चावलेला साप हा विषारीच असतो असे नाही. घाबरून न जाता योग्य प्रथमोपचार घेतल्यास दंश झालेल्याचा जीव निश्चित वाचू शकतो.

अशी करतात जनजागृती

  • सर्पदंश झाल्यास करावयाचे प्राथमिक उपचार

  • सापांविषयी ऑनलाइन व्याख्याने, स्लाइड शोचे आयोजन

  • स्थानिक पातळीवरील कार्यशाळांद्वारे माहिती देणे

  • आशा वर्कर्स, वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

  • सर्पमित्रांमध्ये सर्पदंशांबाबत जागरूकता निर्माण करणे

अशी घ्या काळजी

  • पायाला दंश झाल्यास मांडीला आवळ पट्टी बांधावी

  • आवळपट्टी अतिघट्ट बांधू नये यामुळे संबंधितास त्रास होतो

  • रुग्णास लिंबाचा पाला, मिरच्या खाऊ घालू नयेत

  • दंशाच्या भाग कापू नये. रुग्णास त्वरित दावाखान्यात दाखल करावे

बहुतांश ठिकाणी साप व सर्पदंश, त्यावरील प्राथमिक उपचारांबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृतीचे प्रमाण कमी आहे. नागरिकांमध्ये सापांविषयी आत्मीयता वाढून सांपापासून आपले संरक्षण व सर्पदशांतून प्राण वाचण्यासाठी विविध अभिनयातून मी व पत्नी व्याख्याने, ऑनलाइन मार्गदर्शन करत असतो.

- डॉ. सदानंद राऊत, सर्पदंश व विषबाधा तज्ज्ञ

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com