रावेतला स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी

ज्ञानेश्वर भंडारे
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

वाल्हेकरवाडी - रावेत परिसराचा विकास झपाट्याने वाढत आहे, त्याचप्रमाणे गुन्हेगारीही वाढत आहे. रावेत परिसरात गुन्हा घडला अथवा काही कारणास्तव पोलिस स्टेशनला काम पडले तर नागरिकांना देहूरोडला जावे लागते. रावेत परिसरात एकही पोलिस चौकी नाही त्यामुळे परिसरात पोलिस चौकी पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे. 

वाल्हेकरवाडी - रावेत परिसराचा विकास झपाट्याने वाढत आहे, त्याचप्रमाणे गुन्हेगारीही वाढत आहे. रावेत परिसरात गुन्हा घडला अथवा काही कारणास्तव पोलिस स्टेशनला काम पडले तर नागरिकांना देहूरोडला जावे लागते. रावेत परिसरात एकही पोलिस चौकी नाही त्यामुळे परिसरात पोलिस चौकी पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे. 

प्रचंड लोकसंख्येचा भाग म्हणून रावेत परिसर ओळखला जातो. चिंचवड, निगडी, आणि देहूरोड पोलिस स्टेशन च्या हद्दीवर असल्यामुळे नेमकी तक्रार कुठे द्यायची हा नागरिकांना नेहमी प्रश्न असतो. नामांकित शैक्षणिक संस्था तसेच हिंजवटी आयटी पार्क जवळ असल्यामुळे व शांततेचा परिसर म्हणून रावेत मध्ये राहणाऱ्याची संख्या मोठी आहे. रावेत मुख्य चौकात नेहमी वाहनांची वर्दळ असते, लहानमोठे अपघात हे ठरलेलेच पण कुठल्याही चौकात वाहतूक पोलिस हा दृष्टीस पडत नाही.वाहतूक पोलिसांचे दर्शन हे नागरिकांसाठी दुर्मिळच झाले आहे. जवळच रावेतचे वैभव असणारे संत तुकाराम पूल आहे यावर प्रेमीयुगलनांचा वावर खुप असतो त्यांचा गाड्या रस्त्यावरच लावलेल्या असतात त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. रावेत व चिंचवड ला जोडणारा रस्ता हा रस्ता रखडलेला आहे.या रस्त्यावर रात्री मद्यपी दारू पित असतात. दारू पिऊन झाल्यावर ते बाटल्या तिथंच फोडतात त्यामुळे रस्त्यावर काचेचा सडा पडलेला आहे. यांच्यावर कायदाच कसलाही वचक नाही. यांचा त्वरित बंदोबस्त करावा व रावेत चौकात  पोलिस चौकी त्वरित चालू करावी अशी नागरिकांची मागणी आहे.

रावेतच्या मुख्य चौकात देहूरोड अंकित  येथील लोकसेवकाच्या मदतीने पोलिस चौकी उभारण्यात आली होती. पण चौकी उभारली तेव्हापासून तिथे कधी  अधिकारी तर सोडाच पोलिस हवालदार पण पहावयास मिळाला नाही, नंतर काही दिवसांनी एका रात्री ती पोलिस चौकी गायब होऊन त्या ठिकाणी नविन व्यवसायाचे दुकान चालू झाले असे नागरिक सांगतात. 

परिसरात गुन्हेगारी व अपघाताचे प्रमाण पाहता देहूरोड पोलिस चौकी खूप लांब आहे. त्यापेक्षा चिंचवड किंवा निगडी हे दोन्ही पोलिस स्टेशन च्या हद्दी जवळ आहेत, शहरात नवीन आयुक्तालय स्थापन झाले आहे, रावेत ची लोकसंख्या पाहता पोलिस चौकी होणे गरजेचे आहे , आम्ही रावेत सिटीझन फोरम च्या वतीने आयुक्तांना निवेदन देणार आहोत. अन्वर मुलाणी, रावेत रहिवाशी.

रावेत परिसर हा लोकसंख्येच्या दृष्टीने वाढत आहे, त्याचप्रमाणे या उपनगराच्या जवळूनच द्रुतगती महामार्ग गेलेला आहे, दिवसेंदिवस परिसरात गुन्हेगारी वाढत आहे,त्यामुळे परिसराला पोलिस चौकीची गरज आहे- प्राजक्ता रुद्रावार, रावेत रहिवाशी.

Web Title: Ravet's demand for an independent police post