
Eknath Shinde: पुण्यातील काँग्रेस नेते तथा माजी आमदार रवींद्र धंगेकर हे शिवसेनेत प्रवेश करणार, अशा चर्चा गुरुवारपासून सुरु आहेत. त्याचं कारण त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावर धंगेकरांनी शुक्रवारी सकाळी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना प्रवेशाबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.