'रयत'च्या शाळा सुरु; पण...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 May 2020

- बारामतीत रयतच्या शाळांकडून ऑनलाईन शिक्षणास प्रारंभ

बारामती : लॉकडाऊनमुळे शाळा-महाविद्यालयांचे कामकाज नेमके केव्हा सुरु होईल, हे निश्चित नसल्याने रयत शिक्षण संस्थेने ऑनलाईन शिक्षणास प्रारंभ केला आहे. विद्यार्थ्यांचे संभाव्य शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या उद्देशाने रयतने हे पाऊल उचलले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बारामतीतही आर. एन. आगरवाल टेक्निकल हायस्कूल तसेच श्री छत्रपती शाहू हायस्कूलच्या वतीने ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा अवलंब सुरु करण्यात आला आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे सर्वसाधारण मंडळाचे सदस्य सदाशिव सातव यांनी केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बारामतीतील दोन्ही प्रमुख विद्यालयांतूनही असे कामकाज सुरु झाले आहे. घरातच थांबून मुलांना शिक्षण देण्याची ही पद्धत अभिनव असून, हळुहळू मुलेही ती आत्मसात करु लागली आहेत. 
सदर उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संस्थेचे सचिव डॉ. भाऊसाहेब काराळे, पश्चिम विभागीय अध्यक्ष राम कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली खाली संस्थेच्या पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी के. डी. रत्नपारखी, सहाय्यक विभागीय अधिकारी एस. टी. पवार प्रयत्नशील आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दररोज अभ्यासक्रमाची लिंक पाठवणे, मुख्याध्यापक व शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांचा फीडबॅक घेऊन झूम मिटिंगच्या माध्यमातून त्यांना येणाऱ्या अडचणींबाबत त्यांच्याकडून मार्गदर्शन केले जाते.   

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आवड होत आहे निर्माण

ही पद्धत नवीन असली तरी हळुहळू विद्यार्थी व शिक्षक याला सरावत आहे, त्यांच्यात याबाबत आवड निर्माण होऊ लागली आहे. घरी बसून मुलांना शिक्षण देण्याचा हा प्रकार अभिनव आहे.

- राजेंद्र काकडे, प्राचार्य, आर. एन. आगरवाल टेक्निकल हायस्कूल. 

शिक्षकांनाही नवीन माहिती होते 

ग्रामीण भागातील शिक्षकांनाही या निमित्ताने नव्याने माहिती मिळवण्यासह अनेक नवीन बाबी शिकण्याची संधी मिळाली, शिक्षणात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करता येतो हेही समजू लागले आहे.

- गणपत तावरे, ज्येष्ठ उपशिक्षक, श्री छत्रपती शाहू हायस्कूल, बारामती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rayat Shikshan Sanstha Started School via Online