पुण्यातील बजाज फायनान्सला RBIचा दणका! तब्बल अडीच कोटींचा आकारला दंड 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 January 2021

रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या जोखीम व्यवस्थापन आणि अचारसंहितेच्या सुचनांचे पालन पुण्यातील बजाज फायनान्स कंपनीने केले नाही. तसेच NBFCसाठी लागू केलेल्या फेअर प्रॅक्टिस कोडकडे देखील दुर्लक्ष होत असल्याचे RBI चे म्हणणे असून RBI Act अंतर्गत ही कारवाई केली आहे. रिकव्हरी करताना ग्राहकांना त्रास होणार नाही याची काळजी कंपनीला घेता आली नाही असे RBIने सांगितले आहे. 

पुणे : नॉन- बँकिंग वित्तीय सेवा देणारी बजाज फायनान्स (NBFC Bajaj Finance) कंपनीला आरबीआय(Reserv Bank Of India) ने नियामक नियमांचे उल्लंघन अडीच कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिकव्हरी आणि कलेक्शनसाठी वारंवार चुकीच्या पध्दीचा वापर होत असल्याच्या तक्रारी कंपनीविरोधात ग्राहकांकडून होत आहेत. त्याचबरोबर फेअर प्रॅक्टीस कोडच्या नियामांचेही कंपनीने उल्लंघन केल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे नियामक नियमांचे उल्लंघन केल्याने हा दंड आकारण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या जोखीम व्यवस्थापन आणि अचारसंहितेच्या सुचनांचे पालन पुण्यातील बजाज फायनान्स कंपनीने केले नाही. तसेच NBFCसाठी लागू केलेल्या फेअर प्रॅक्टिस कोडकडे देखील दुर्लक्ष होत असल्याचे RBI चे म्हणणे असून RBI Act अंतर्गत ही कारवाई केली आहे. रिकव्हरी करताना ग्राहकांना त्रास होणार नाही याची काळजी कंपनीला घेता आली नाही असे RBIने सांगितले आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा  
बजाज कंपनीकडून हा दंड आकरण्यापुर्वी RBIने कारणे दाखवा नोटीस पाठवली होती.  नियमांचे उल्लंघन झाल्या कंपनीवर दंड का आकाराला जाऊ नये, यावर स्पष्टीकरण नोटीस मध्ये विचारले होते. ग्राहकांना त्रास झाला नाही हे बजाज फायनान्सला सिध्द करता आले नाही. त्यावर उत्तर मिळाल्यानंतर केंद्रीय बँकेने दंड आकारण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, या कारवाईमुळे कंपनीने ग्राहकांसह केलेल्या कोणताही व्यवहार किंवा करारच्या वैधतेवर शंका घेण्याचा हेतू नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले. ही कारवाई नियमाक अनुपालनातील कमतरतांवर आधारीत असल्याचेही यावेळी स्पष्ट केले. 
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI imposes Rs 2.5 crore fine on Pune based Bajaj Finance