लस घेतल्यानंतर कोरोनायोद्ध्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 January 2021

आज लस घेताना हे कष्ट सार्थकी लागले. आज आमचाच आम्हाला अभिमान वाटतोय, अशी भावनिक प्रतिक्रिया औंध जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिका चालक म्हणून कार्यरत असलेले शशिकांत लोहार आणि अविनाश गावडे यांनी दिली.

पुणे - कोरोनाच्या प्रसाराला पुण्यातूनच सुरुवात झाली. तेव्हापासून सर्वांच्याच मनात कोरोनाबद्दल थोडीफार भीती होतीच. रुग्णांची वाढती संख्या, लॉकडाउनमध्ये पुण्यातील निर्मनुष्य रस्ते, एकटे पडणारे रुग्ण, नातेवाइकांविना होणारे अंत्यविधी, सगळं काही या डोळ्यांनी बघितलं... 

...आपल्यामुळे कुटुंबातील लोकांना कोरोना होईल, ही भीती मनात असतानाही हृदयावर दगड ठेवून प्रामाणिकपणे गेली नऊ महिने काम केले. आज लस घेताना हे कष्ट सार्थकी लागले. आज आमचाच आम्हाला अभिमान वाटतोय, अशी भावनिक प्रतिक्रिया औंध जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिका चालक म्हणून कार्यरत असलेले शशिकांत लोहार आणि अविनाश गावडे यांनी दिली. लसीकरणानंतर त्यांच्याप्रमाणेच सर्वच लाभार्थ्यांची प्रामाणिक कष्टाचे फळ मिळाल्याची  प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक केंद्रावर १०० लाभार्थ्यांचे लसीकरण निश्‍चित करण्यात आले होते. त्यासंबंधी त्यांना कोविन ॲप, मेसेज आणि प्रत्यक्ष फोन करूनही बोलविण्यात आले. सकाळी साडेदहा वाजताच पंतप्रधानांच्या संबोधनाला बहुतेक लाभार्थी आणि अधिकारी उपस्थित होते. आपण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनत असल्याने सर्वांचाच उत्साह वाखाणण्याजोगा होता. लसीकरण झाल्यानंतर निरीक्षण कक्षात सुमारे अर्धा तास थांबलेले लाभार्थी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपापल्या कामावर परतत होते. कोणी ॲप्रॉन घालून ऑपरेशन थिएटरमध्ये, कोणी रुग्णांना तपासायला, तर कोणी रुग्णांना गावाकडे परत सोडण्यासाठी परतले. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

उत्साह अन्‌ सजावट
शहरातील लसीकरण केंद्रांवर रांगोळ्यांच्या पायघड्या
लसीकरण कक्षांची सजावट 
आरोग्य कर्मचारी, अधिकारी, राजकीय नेते, माध्यम प्रतिनिधी उपस्थित

CET सेलकडून विद्यार्थ्यांना दिलासा; जात, इडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यासाठी मुदतवाढ

कोरोनाच्या लशीबद्दल प्रचंड उत्सुकता होती. जगभरातील लशीच्या संशोधनावर आम्ही लक्ष ठेवून होतो. आज सकाळीच लसीकरणाच्या लाभार्थ्यांमध्ये माझे नाव असल्याचे समजले. लस घेतल्यानंतर माझ्या मनात समाधानाची भावना असून, अजून कोणतेही दुष्परिणाम जाणवत नाही. 
- डॉ. नितीन उगले, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय

हे वाचा - CET सेलकडून विद्यार्थ्यांना दिलासा; जात, इडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यासाठी मुदतवाढ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: reaction of corona-fighter after taking the first corona vaccine