
पुणे : मोडकळीस आलेल्या बसच्या अंतर्गत व बाह्य रूपात आवश्यक तो बदल करून ही बस विद्यार्थी व प्रवाशांना वाचनाचा ‘प्रवास’ घडविणार आहे. पीएमपी प्रशासनाने आपल्या बसमध्येच वाचनालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या सहकार्याने पीएमपी आपल्या जुनाट बसमध्येच वाचनालय सुरू करीत आहे. नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर ही बस वाहतुकीला अडथळा न ठरणाऱ्या जागी थांबेल. तिथे प्रवासी व विद्यार्थ्यांना वाचनाचा आनंद घेता येईल. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.