Ready Reckoner : नवीन रेडीरेकनरमध्ये पुण्यात सदनिकांचे दर प्रतिचौरस फूट दोन हजार रुपयांनी वाढले

रेडीरेकनरमध्ये सर्वांत महागड्या परिसरामध्ये विधी महाविद्यालयाने (लॉ कॉलेज) कोरेगाव पार्क परिसराला मागे टाकले.
Ready Reckoner Update Pune Apartment Prices Rise by rupees 2000 Per square feet
Ready Reckoner Update Pune Apartment Prices Rise by rupees 2000 Per square feetsakal
Updated on

पुणे - रेडीरेकनरमध्ये सर्वांत महागड्या परिसरामध्ये विधी महाविद्यालयाने (लॉ कॉलेज) कोरेगाव पार्क परिसराला मागे टाकले असले, तरी प्रत्यक्षात गोखले चौक ते बाजीराव रस्ता आणि लक्ष्मी रस्त्यावरील सदनिकांच्या प्रतिचौरस फुटाच्या किमतीमध्ये सार्वधिक वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी (२०२४-२०२५) या परिसरातील सदनिकांच्या रेडीरेकनरमध्ये प्रतिचौरस फूट दर आठ हजार ६३५ रुपये होता. त्यामध्ये दोन हजार २३ रुपयांनी वाढ होऊन चालू आर्थिक वर्षात (२०२५-२६) ते १० हजार ६५८वर गेले आहेत. नांदोशी येथील सदनिकांच्या प्रतिचौरस फुटाच्या दरात सर्वांत कमी म्हणजे २९२ रुपयांनी वाढ झाली आहे.

new ready reckoner rates in pune
new ready reckoner rates in punesakal

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून नुकतेच चालू आर्थिक वर्षासाठीचे (२०२५-२६) रेडीरेकनरमधील नवे दर जाहीर केले आहेत. रेडीरेकनरमध्ये विधी महाविद्यालय, कोरेगाव पार्कसह शहरातील दहा भाग महागडे ठरले आहेत.

या दोन्ही परिसरातील सदनिकांचे दर हे सर्वाधिक असले, तरी प्रत्यक्षात विधी महाविद्यालयाच्या परिसरातील सदनिकांसाठीचे गेल्या वर्षीच्या (२०२४-२५) रेडीरेकनरमध्ये प्रतिचौरस फुटाचे दर १५ हजार २८३ होते. त्यामध्ये एक हजार ५२७ रुपयांनी वाढून नवीन आर्थिक वर्षात १६ हजार ८१० रुपये झाले आहेत.

तर कोरेगाव परिसरात सदनिकांचे प्रतिचौरस फुटाचा दर १६ हजार ३४ रुपये होता. तो आता ६४१ रुपयांनी वाढून १६ हजार ८७५ इतके झाले आहेत. या दोन्ही रस्त्यावरील सदनिकांच्या प्रतिचौरस फुटाच्या दरामध्ये झालेली वाढ आणि गोखले चौक बाजीराव रस्ता आणि लक्ष्मी रस्त्यावरील सदनिकांच्या प्रतिचौरस फुटास झालेली वाढ विचारात घेतली तर ती सर्वाधिक वाढ ठरली आहे.

प्रभाग रस्ता, भांडारकर रस्ता आणि विधी महाविद्यालय परिसरात सदनिकांचे प्रतिचौरस फुटाचे दर गेल्या आर्थिक वर्षात १३ हजार ९५४ रुपये प्रतिचौरस फूट होते. त्यामध्ये एक हजार ३९६ रुपयांनी वाढून प्रतिचौरस फूट १५ हजार ३५० रुपयांवर गेले आहेत.

तर गरवारे हायस्कूल ते एसएनडीटी दरम्यानच्या सदनिकांचे गतवर्षी प्रतिचौरस फुटाचे दर १२ हजार २८३ इतके होते. त्यामध्ये एक हजार २८३ रुपयांनी वाढ होऊन ते १४ हजार १०९ प्रतिचौरस फूट इतके झाले आहेत. सर्वांत कमी दरवाढ ही नांदोशी येथील सदनिकांच्या दरात झाली आहे.

नांदोशी येथील सदनिकांचे गतवर्षी प्रतिचौरस फुटाचा दर २ हजार ९२२ इतका होता. त्यामध्ये अवघी २९२ रुपये प्रती चौरस फुटाने वाढ होऊन तीन हजार २१४ प्रती चौरस फूट इतका झाला आहे.

दुकाने

जंगली महाराज रस्ता, गरवारे आयलंड ते बालगंधर्व नाट्यगृह

११ हजार ५०

१२ हजार १५६

१ हजार १०६

जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व नाट्यगृह ते रेल्वे ओव्हरब्रीज सबअर्बन टीपी स्कीम

९ हजार ४१२

११ हजार ५५

१ हजार ६४३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com