शंभर कोटींवर पाणी! स्पर्धा परीक्षांचे अर्थकारणच ठप्प

The reason for the competition exams is stagnant
The reason for the competition exams is stagnant

पुणे : पुणे स्पर्धा परीक्षांचे हब बनले, शहराच्या मध्यवर्ती भागात मार्गदर्शन करणारे क्‍लास, अभ्यासिका हाऊसफुल असायच्या, पुस्तक विक्रीच्या दुकानात कायम विद्यार्थ्यांची वर्दळ असायची. पण हा झाला भूतकाळ. गेल्या सहा महिन्यांपासून क्‍लासच्या इमारती ओस पडल्या आहेत. क्‍लास चालकांना भाडे भरणेही अवघड झाल्याने क्‍लास बंद करावे लागले आहे. विद्यार्थी गावाकडेच बसून, ऑनलाइन शिक्षणाची सवय अंगवळणी पाडून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्वस्थितीत क्‍लासचालकांचे 100 कोटीचे अर्थकारण ठप्प झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पदवी शिक्षण पूर्ण होत आले की मुलामुलींना आपण शासकीय सेवेत जावे, अधिकारी व्हावे असे वाटायला लागते. आई वडीलही मुलांना संधी द्यायला पाहिजे यासाठी त्यांना पुण्याला पाठवतात. केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये (एमपीएससी) विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या यशामुळे 21 व्या शतकाच्या सुरवातीपासून पुणे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचे केंद्रच बनले. दरवर्षी हजारो विद्यार्थी आपले स्वप्न उराशी बाळगून पुण्यात येऊ लागले. विद्यार्थी संख्या जशी वाढत जाऊ लागली, तसे क्‍लासेसचेही संख्या वाढू लागली. विद्यार्थ्यांना आपल्या क्‍लासमध्ये प्रवेश घ्यावा यासाठी क्‍लासमध्येच "स्पर्धा' लागली. मोफत मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून, यूपीएससी, एमपीएससीमध्ये टॉप करणाऱ्या व प्रेरणादायी भाषण देऊ शकणाऱ्या "प्रसिद्ध' अधिकाऱ्यांना बोलावून, विद्यार्थ्यांना "तुम्ही 100 टक्के अधिकारी होणारच' असा "विश्‍वास' क्‍लासचालक निर्माण करत. आजमितीस पुण्यात परीक्षेचे मार्गदर्शन करणारे 50पेक्षा जास्त क्‍लासेस आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यात सध्या सुमारे 1 लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. दरवर्षी साधारणपणे 20 ते 25 हजार नव्या विद्यार्थ्यांची यात भर पडते. त्यातील अनेकांना स्पर्धा परीक्षेतील अगदी मूलभूत संकल्पनांपासून तयारी करायची असते, त्यासाठी ते वर्षभराचा क्‍लास लावून एमपीएससी, यूपीएससीचा अभ्यास सुरू करतात. सरसकट एकाच क्‍लासमध्ये सर्व काही शिकवले जाते असे नाही, तयारी वेगळ्या पद्धतीने करावी लागणार हे लक्षात आल्यानंतर विद्यार्थी विषयानुसार क्‍लास लावून अभ्यास करण्यास सुरवात करतात. "यूपीएससी'साठी साधारपणे दीड लाखाच्या घरात शुल्क आहे तर, "एमपीएससी"मार्फत भरल्या जाणाऱ्या राज्यसेवेच्या परीक्षेच्या तयारीसाठी वर्षभरासाठी 50 ते 1 लाखापर्यंत शुल्क आकारले जाते. वर्ग दोनच्या पदांसाठी 30 ते 50 हजारापर्यंत शुल्क घेतले जात आहेत, वर्ग तीनच्या पदांसाठी तीनच्या पदांसाठी 25 ते 30 हजार रुपये शुल्क भरावे लागते. "युपीएससी'च्या पर्यायी विषयाच्या मार्गदर्शनासाठी किमान 60 हजार, तर "एमपीएससी'च्या एका विषयाच्या क्‍लाससाठी 10 हजारांपासून ते 25 हजारापर्यंत रुपये शुल्क आहे.

कोरोनाने काय झाले ?
मार्च 2020 पर्यत पुण्यातील क्‍लासचालकांची स्थिती उत्तम होती. कोरोनाच्या दहशतीने क्‍लास, अभ्यासिका बंद झाल्या. महिन्याभरात पुन्हा सुरळीत होईल या आशेने विद्यार्थी गावाकडे निघून गेले. सरकारने लॉकडाऊनच्या माध्यमातून क्‍लासवर निर्बंध आणले. आता सहा महिने उलटून गेले तरी पुण्यातील क्‍लासचे टाळे उघडलेले नाही. एका क्‍लासमध्ये कमीत कमी 200 ते जास्तीत जास्त 400 विद्यार्थी एका असतात, त्यासाठी मोठे हॉल, तीन ते चार मजली आख्खी इमारत भाड्याने घेऊन विद्यार्थ्यांना "ज्ञानदान' करतात. यासाठी क्‍लासचालकांना महिन्याला 1 लाख ते 5 लाखापर्यंत भाडे आहे. विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या मार्गदर्शकांना त्यांच्या कौशल्यानुसार मानधन दिले जाते. काहींना प्रती लेक्‍चर 1 हजार ते 3 हजार, तर काहीजणांनी महिन्याला दोन ते पाच लाख रुपये मानधन आहे. क्‍लासचालक काही प्राध्यापकांना नोकरीवरच ठेवत असल्याने त्यांनाही 50 हजारांपासून ते 3-4 लाखापर्यंत पगार आहेत. एकीकडे भाडे तर दुसरीकडे प्राध्यापकांचे पगार अशा क्‍लासचालक सापडले आहेत. क्‍लासचालकांना भाडे देणे परवडत नसल्याने जागा सोडून देण्याची वेळ आली आहे. तर, काहींना भाडे भरून अजून तग धरला आहे, पण क्‍लास सुरू झाले नाहीत तर त्यांचीही अवघड स्थिती आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुस्तक विक्रीला झळ
शासनाकडून पदभरतीची घोषणा होताच विद्यार्थी अर्ज दाखल करून पुस्तके खरेदीसाठी गडबड करतात. गेल्यावर्षी विद्यार्थ्यांनी पुस्तक खरेदी केली. पण कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने नवी पदभरती करणार नसल्याचे जाहीर केल्याने स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचाही व्यवहार ठप्प झाला आहे. अनेकांनी माहिती अद्ययावत करून पुस्तके छापून ठेवली होती, पण लॉकडाऊन काळात दुकाने बंद असल्याने व आता ग्राहक नसल्यानेही पुस्तके गोडाऊनमध्ये धूळ खात पडली आहेत. सहा महिन्यात घडलेल्या घडामोडींमुळे ही पुस्तकांची पुन्हा सुधारित आवृत्ती छापण्याची वेळ येणार आहे, असे के. सागर प्रकाशनाचे डॉ. अनिरुद्ध क्षीरसागर यांनी सांगितले.

"विद्यार्थी संख्या, त्यांचे शुल्क व क्‍लासेसची संख्या बघता पुण्यात स्पर्धा परीक्षा क्षेत्रात किमान 100 कोटींची उलाढाल आहे. कोरोना'मुळे गेल्या सहा महिन्यांपासून स्पर्धा परीक्षेचे क्‍लासेस बंद आहेत, यामध्ये छोट्या क्‍लासची वाताहत झाली, त्यामधून ते सावरणे आवश्‍यक आहे. यासाठी सरकारने कमी क्षमतेमध्ये क्‍लासेस पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी दिली पाहिजे.''
- बंडोपंत भुयार, सदस्य, खासगी शिकवणी अधिनियम समिती.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

"मार्चपासून प्रत्यक्षातील मार्गदर्शन पूर्ण बंद आहेत, त्यामुळे आर्थिक नुकसान मोठे झाले आहे, भाड्याने घेतलेल्या जागा सोडाव्या लागल्या आहेत. सद्यःस्थिती बघता यातून सावरण्यासाठी ऑनलाइन क्‍लासेस सुरू केले. पण गतवर्षीच्या तुलनेत आता केवळ 15 ते 20 टक्केच विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या, मोबाईल व इतर साधने नसल्याने अनेकांची पसंती ही थेट वर्गात येऊन शिकण्यासाठीच आहे. या कठीण परिस्थितीतून मार्ग निघाल्यास क्‍लास सुरू केले जातील.''
- तुकाराम जाधव, प्रमुख, युनिक ऍकॅडमी

"कोरोनामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे, विद्यार्थी क्‍लासला येऊ शकत नाहीत, त्यामुळे ऑनलाइन क्‍लास घेण्यास सुरूवात केली आहे. पण प्रत्यक्षात शिकवताना जसा प्रतिसाद असतो, तसा ऑनलाइनला प्रतिसाद नाही. पुढील वर्षभर परस्थिती अशीच असेल असे वाटते.''
- सचिन ढवळे, संचालक, मॅथ्स अँड रिझनींग ऍकॅडमी

महापालिकेच्या दाव्यावर "पाणी'; पावसाळ्याआधी गटारांची डागडुजी नाहीच

- गतवर्षीच्या तुलनेत 15 ते 20 टक्के विद्यार्थीच ऑनलाइन क्‍लासमध्ये
- भाडे भरणे शक्‍य नसल्याने क्‍लासचालकांना हॉल सोडावे लागले.
- नवे विद्यार्थी पुण्यात येण्यावर लागला ब्रेक
- मार्गदर्शकांच्या मानधनावर परिणाम
- कमी उपस्थितीत क्‍लास सुरू करू देण्याची मागणी


स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी - 1 लाख
क्‍लासची संख्या - 50
मार्गदर्शसाठीचे शुल्क - 10000 ते दीड लाख

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com