Mahesh Madake and Pratik Shinde
sakal
आळंदी - नवीन घेतलेल्या चारचाकी वाहनाचा आनंद साजरा करण्यासाठी केलेली स्टंटबाजी एका कथित महाराजाच्या अंगलट आली आहे. नवीन इनोव्हा क्रिस्टा कार बेदरकारपणे, धोकादायक रित्या चालवून गोल-गोल फिरवत जीवघेणे स्टंट केल्याप्रकरणी आणि जमलेल्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी आळंदीतील कथित महाराज महेश बाळकृष्ण मडके (रा. गोपालपुरा, आळंदी) आणि बारामती येथील रीलस्टार प्रतीक शिंदे यांच्यासह इतर पाच जणांविरुद्ध आळंदी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता. 9) गुन्हा दाखल करण्यात आला असून चारचाकी वाहन जप्त करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिली.