पुणे - शहरातील रस्ते झाडण्याच्या निविदा ठरावीक ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून काढण्यात आल्या होत्या. या निविदा रद्द केल्या असल्या तरी या निविदांसाठी झालेला प्रशासकीय खर्च संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करा अशी मागणी आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसभेत केली.