

प्रकल्पग्रस्त भरतीतील अन्यायाविरुद्ध
स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा इशारा
ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्तांच्या भरती प्रक्रियेत अन्याय होत असल्याचा आरोप करीत काही प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी स्वातंत्र्यदिनी शनिवारी (ता. १५) कुटुंबीयांसह आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. या बाबत उमेदवारांनी २८ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे.
निवेदनानुसार, कृषी विद्यापीठाने ४५१ कर्मचाऱ्यांची प्रकल्पग्रस्त प्रवर्गाअंतर्गत यादी दिली आहे. या यादीची सखोल चौकशी करावी, तसेच जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालयामार्फत पदभरती प्रक्रियेत झालेल्या कथित गैरप्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केली आहे.
दरम्यान, अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने ३० जुलै रोजी अकोला जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या निवेदनावर आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच संबंधित उमेदवारांना आत्मदहनापासून परावृत्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. आता प्रशासन या प्रकरणी कोणती भूमिका घेते, याकडे प्रकल्पग्रस्त उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.