

45 km Journey Turns Harrowing as State Transport Bus Fails Repeatedly on Road
esakal
कवठे येमाई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राजगुरुनगर आगाराच्या भोंगळ कारभाराचा फटका सोमवारी (ता. ८) सकाळी प्रवाशांना बसला. राजगुरुनगरहून कवठे येमाई मार्गे शिरूरकडे येणारी एसटी बस (एमएच १४ बीटी ४७९७) शिंदेवाडी (ता. शिरूर) येथे अचानक बंद पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. विशेष म्हणजे ही बस राजगुरुनगरपासून शिंदेवाडीपर्यंत ४५ किलोमीटरच्या प्रवासात तब्बल पाच ते सहा वेळा बंद पडली.