पुणे जिल्ह्यातील २१० ग्रामपंचायती मुलींच्या संख्येत रेड झोनमध्ये

पुणे जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींपैकी २१० ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील मुलींच्या जन्माचे प्रमाण दर हजारी मुलांच्या प्रमाणात आठशेपेक्षा कमी झाले आहे.
reduction in girls birth rate in pune 210 gram panchayat red zone in girls birth rate
reduction in girls birth rate in pune 210 gram panchayat red zone in girls birth rate sakal

पुणे : पुणे जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींपैकी २१० ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील मुलींच्या जन्माचे प्रमाण दर हजारी मुलांच्या प्रमाणात आठशेपेक्षा कमी झाले आहे. यापैकी काही ग्रामपंचायतींच्या हद्दीत हेच प्रमाण साडेचारशेच्या आत आले आहे. यामुळे या सर्व ग्रामपंचायती मुलींच्या जन्माच्या प्रमाणाच्या बाबतीत रेड झोनमध्ये गेल्या आहेत. मुलींच्या जन्माच्या प्रमाणाच्या बाबतीत रेड झोनमध्ये गेलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सर्वाधिक प्रत्येकी २६ ग्रामपंचायती या खेड आणि जुन्नर या दोन तालुक्यातील आहेत. या दोन तालुक्यांच्या पाठोपाठ भोर आणि आंबेगाव या दोन तालुक्यातील प्रत्येकी २२ गावांचा समावेश आहे. बारामती आणि वेल्हे या दोन तालुक्यातील सर्वात कमी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या दोन तालुक्यातील प्रत्येकी नऊ ग्रामपंचायतींमधील मुलींचे प्रमाण कमी झाले आहे.

सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यात एक हजार मुलांच्या मागे सरासरी ९४१ मुली आहेत. हेच प्रमाण २०११ च्या जनगणनेनुसार दर हजारी मुलांमागे ८८३ मुली इतके होते. त्यामुळे गेल्या दहा वर्षात जिल्ह्यातील मुलींच्या प्रमाणात सरासरी ५८ ने वाढ झाली आहे. जिल्हा परिषदेच्या महिला, बालकल्याण आणि आरोग्य विभागाच्यावतीने पुणे जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर निश्‍चित करण्यासाठी शून्य ते सहा वर्षे या वयोगटातील मुला-मुलींचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या या सर्वेक्षणातून हे प्रमाण निश्‍चित झाले आहे.

या सर्वेक्षणात मुला-मुलींच्या प्रमाणानुसार गावे आणि तालुक्यांचे स्वतंत्रपणे तीन झोनमध्ये वर्गीकरण करण्यात आले. या वर्गीकरणात मुलींचे प्रमाण चांगले असलेले गावे आणि तालुक्यांची गणना ग्रीन झोन, समाधानकारक प्रमाण असलेले गावे आणि तालुक्यांची गणना आॅंरेंज तर, खुपच कमी संख्या असलेल्या गावांची गणना रेड झोनमध्ये करण्यात आली आहे.

रेड झोनमधील तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या

  • जुन्नर, खेड - प्रत्येकी २६

  • भोर, आंबेगाव - प्रत्येकी २२

  • पुरंदर - २१

  • मुळशी - १८

  • दौंड, हवेली, इंदापूर - प्रत्येकी १२

  • शिरूर -११.

  • मावळ - १०

  • बारामती, वेल्हे - प्रत्येकी ०९

    पुणे जिल्हा एकूण --- २१०

जिल्ह्यातील २१० ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील दर हजारी मुलांमागील मुलींच्या जन्माचे प्रमाण तुलनेने खूप कमी झाले आहे. मागील सहा वर्षापासून हे प्रमाण कमी होत गेले आहे. या गावांमधील मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेत या गावांमधील सरपंच, ग्रामसेवक आणि पोलिस पाटलांची कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यक्षेत्रात सर्वांना मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविणे, बाल अत्याचार रोखणे आणि बाल विवाहाला प्रतिबंध घालण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com