esakal | बारामती क्राईम ब्रँचमध्ये होणार मोठा बदल; वाचा सविस्तर...
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती क्राईम ब्रँचमध्ये होणार मोठा बदल; वाचा सविस्तर...

- अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांचा निर्णय

बारामती क्राईम ब्रँचमध्ये होणार मोठा बदल; वाचा सविस्तर...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बारामती : आगामी काळात पोलिस दल अधिक लोकाभिमुख पध्दतीने कामकाज करेल. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासोबतच गुन्हेगारी व अवैध व्यवसायाविरुध्द पोलिस जोरदार कारवाई करतील, असा इशारा नूतन अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान बारामतीत कार्यरत असलेली बारामती गुन्हे शाखा अर्थात बारामती क्राईम ब्रँच त्यांनी बरखास्त केली असून, लवकरच त्याची पुर्नरचना करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 
बारामतीत आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी आगामी योजनांबद्दल विवेचन केले. ते म्हणाले, बारामती क्राईम ब्रँचचे काम उत्तम होते, बारामतीत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे दुसरे युनिट सुरु करण्याचा विचार आहे. त्यासाठी नवीन अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले जातील. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

बारामतीत गुन्हेगारीचे प्रमाण तुलनेने कमी असून शहरात वाहतूकीची समस्या मोठी आहे. त्या मुळे त्या बाबतही लोकांना दिलासा मिळावा या उद्देशाने काही उपाययोजना केल्या जातील. वाहतूक कोंडीसह पार्किंग व इतर बाबींविषयीही संबंधितांशी चर्चा करुन या बाबतही काही निर्णय घेऊ. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

लोकांमध्ये वाहतुकीबाबत जागृती निर्माण करण्याचा फारसा फायदा होत नाही, दंडात्मक कारवाई अधिक प्रभावी ठरते. जनजागृती तर करुच पण दंडात्मक कारवाईने लोक पुन्हा तीच कृती करत नाहीत, त्याचा फायदा सर्वांनाच होतो. चार चाकी वाहन चालविताना सीट बेल्ट न लावणे, विनाहेल्मेट दुचाकी चालविणा-यांवरही कारवाई होणार आहे. यामध्ये कारवाईपेक्षाही अपघात झाल्यास कोणाचा जीव जाऊ नये हीच भावना आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

माझ्या अंतर्गत येणा-या 15 पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायावरही कारवाईचे निर्देश संबंधित अधिका-यांना दिलेले असून लोकांनाही काही चुकीचे वाटल्यास ते तशा बाबी निदर्शनास आणून देऊ शकतात.