पुणे : हक्कसोड, वाटणीपत्रसह बक्षीसपत्र दस्तांची नोंदणी सुरू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

गर्दी कमी असेल, तर हक्कसोडपत्र, वाटणीपत्र, बक्षीसपत्र, चुकदुरूस्ती पत्रक यासारखे कमी महत्वाच्या दस्तांची देखील नोंदणी सुरू करण्यास नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दिली आहे.

पुणे : गर्दी कमी असेल, तर हक्कसोडपत्र, वाटणीपत्र, बक्षीसपत्र, चुकदुरूस्ती पत्रक यासारखे कमी महत्वाच्या दस्तांची देखील नोंदणी सुरू करण्यास नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दिली आहे. लॉकडाऊनमुळे इतके दिवस हे दस्त नोंदणी बंद ठेवण्यात आली होती. ती उठल्यामुळे नागरीकांचे अडकलेली कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे. 

हेही वाचा- कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलंय आनंदनगर

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील ग्रीन झोनमधील मधील आणि ग्रामीण भागातील सर्व दस्त नोंदणीची दुय्यम निबंधक कार्यालये सोमवारपासून (दि.18) सुरु करण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने घेतला होता. त्यानुसार पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 27 पैकी 15 तर ग्रामीण भागातील 21 दुय्यम निबंधक कार्यालये सुरू झाली. परंतु सदनिका, दुकाने, जमीन आदी व्यवहारांची दस्त नोंदणी सुरू ठेवण्याचे आदेश विभागाकडून दस्त रजिस्टर कार्यालयांना देण्यात आले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, अन्य कमी महत्वाच्या दस्त नोंदणी बंद ठेवण्यात आली होती. ती आता काही अटींवर उठविण्यात आली आहे. जर एखाद्या कार्यालयात गर्दी नसेल, तर अशा प्रकाराचे कमी महत्वाच्या दस्तांची नोंदणी करता येईल, अशा सूचना नोंदणी महानिरीक्षक ओकप्रकाश देशमुख यांनी सबरजिस्टर यांना दिल्या आहेत. 

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडॉऊन सुरु आहे. ज्या-ज्या भागात परिस्थितीत नियंत्रणात आल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. अशा भागातील दुय्यम निबंधक कार्यालये, मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालये व विशेष विवाह कार्यालये पुरेशी खबरदारी घेऊन सुरु करण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे. त्यानुसार नोंदणी व मुद्रांक विभागाकडून पुण्यातील 17 कार्यालय सुरू करण्यात आली आहे. 

हेही वाचा- कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलंय आनंदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Registration of prize deeds along with allotment certificate