sakal
पुणे - 'राज्यातील अतिवृष्टीमध्ये शेतातील पिके, गुरे-ढोरे व जमीनही वाहून गेली आहे. पीक, गुरा-ढोरांबरोबरच वाहून गेलेल्या जमिनीसाठीही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी लागेल. वास्तव पंचनामे करून तातडीची व कायमस्वरूपी मदत शेतकऱ्यांना द्या. शेतकरी पुन्हा उभा कसा राहिल, याकडे लक्ष द्या.