वडूजच्या नगराध्यक्षपदी रेखा माळी बिनविरोध

वडूजच्या नगराध्यक्षपदी रेखा माळी बिनविरोध
Published on

वडूजच्या नगराध्यक्षपदी रेखा माळी बिनविरोध

वडूज, ता. २५ : येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी रेखा अनिल माळी यांची बिनविरोध निवड झाली, तसेच महेश खडके यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली आहे.
नगरपंचायत कार्यालयात प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी सतीश चव्हाण यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया झाली. निवडीनंतर भाजप नेत्या सोनिया गोरे, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, नंदकुमार मोरे, विकल्प शहा, भाजपचे तालुकाध्यक्ष अनिल माळी, पंचायत समिती सदस्य प्रसाद जुगदर, शशिकांत मोरे, हणमंत बोटे, जिल्हा उपाध्यक्ष संजय शितोळे, श्रीकांत देवकर, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, सुनील गोडसे, सचिन माळी, काकासाहेब बनसोडे, नीलेश कर्पे, माजी नगराध्यक्ष मनीषा काळे, रेश्मा बनसोडे, स्वप्नाली गोडसे, राधिका गोडसे, आरती काळे, शोभा वायदंडे, रोशना गोडसे, शीतल गोडसे, सोमनाथ जाधव, किशोरी पाटील, मनोज कुंभार, संभाजी गोडसे, आप्पासाहेब गोडसे, अक्षय थोरवे, हर्षवर्धन पंडित, राजेंद्र चव्हाण, अशोक बैले, संदीप गोडसे, रेणुका फडतरे आदी उपस्थित होते.
रेखा माळी म्हणाल्या, ‘‘मंत्री जयकुमार गोरे यांनी आपणावर नगराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. आपणाला मिळालेल्या कालावधीत शहराच्या विकासाच्या दृष्टीने चांगले काम करू.’’ प्रसाद जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले. अनिल माळी यांनी आभार मानले.
------
W29934
वडूज : रेखा माळी यांचा सत्कार करताना सोनिया गोरे, डॉ. दिलीप येळगावकर आदी. (आयाज मुल्ला ः सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com