
लोणी काळभोर (पुणे) : उरुळी कांचन, लोणी काळभोर, कदमवाकवस्तीसह पुर्व हवेलीत पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झाला असुन, शनिवारी (ता. १२) दिवसभरात पुर्व हवेलीमधील दहा ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचे तब्बल ६३ रुग्ण आढळून आले आहेत. दहापैकी एकट्या उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत २२ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आले असल्याने, उरुळी कांचन सलग बाराव्या दिवसी कोरोनाच्या बाबतीत रेडझोनमध्ये राहिले आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुर्व हवेलीत एकीकडे रुग्ण वाढीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असतांना, पुर्व हवेलीमधील रुग्णांच्यासाठी वरदान ठरलेले लोणी काळभोर येथील कोविड केअर सेंटर मागील पाच दिवसापासून बंद पडल्याने, रुग्णांना उपचारासाठी बेड मिळवण्यासाठी नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे. खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्यांपासून थेट सरपंच, ग्रामपंचायत सदस्य ते पत्रकार यांच्यापर्यंत विनंती करुन, हात जोडुनही रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नसल्याने पुर्व हवेलीमधील नागरीक हवालदिल बनले आहेत.
लोणी काळभोर, उरुळी कांचनसह पुर्व हवेलीत मागील बारा दिवसापासून कोरोनाने धुमाकुळ घालण्यास सुरुवात केलेली आहे. मागील बारा दिवसात पुर्व हवेलीत तब्बल पाचशेहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळुन आले आहेत. तर दहा रुग्णांचा मृत्यु झालेला आहे. शनिवारी दिवसभऱात उरुळी कांचन (२२), लोणी काळभोर (१४), कदमवाकवस्ती (१०), आळंदी म्हातोबाची (६), कुंजीरवाडी (३), नायगाव (१), पेठ (१), सोरतापवाडी (१), शिंदवने (१), कोरेगाव मुळ (३) व टिळेकरवाडी (१) या दहा ग्रामपंचायत हद्दीत तब्बल ६३ रुग्ण आढळुन आले आहेत. उरुळी कांचन, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या तीन मोठ्या ग्रामपंचायत हद्दीत मागिल बारा दिवसापासून सातत्याने रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
मराठा आरक्षणावरून शासनाचाच 'गोंधळात गोंधळ'; सुधारित आदेश काढल्याने विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा
पोलिसांची दंडात्मक कारवाई लिमिटेड, तर ग्रामपंचायत व आरोग्य विभाग सुस्त...
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी १४ दिवसापुर्वी पुर्व हवेलीसह संपुर्ण जिल्हातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विनामास्क फिरणारे व रस्त्यावर थुंकणार्यांच्या विरोधात पोलिसांना दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यावर तत्कालीन अधीक्षक संदीप पाटील यांच्या आदेशानुसार ग्रामीण पोलिसांनी पहिल्या चार ते पाच दिवसात धडक कारवाई करुन विनामास्क फिरणाऱ्यांच्यावर जरब बसवली होती. मात्र चार दिवसांपुर्वी संदीप पाटील यांची बदली होताच, पोलिसांची कारवाई लिमिटेड स्वरुपात उरली आहे. त्यातच लोणी काळभोर पोलिसांचा कारवाई तर अतिशय लिमिटेड स्वरुपात सुरु आहे. संपुर्ण जिल्हात सर्वाधिक रुग्ण लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळुन येत असतांना, लोणी काळभोर पोलिस मात्र कारवाई बाबत हात आखडता घेत असल्याचे चित्र आहे.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : शैक्षणिक शुल्क होणार कमी? समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष
साहेब, हात जोडतो, पाया पडतो पण आपल्याच परीसरात बेड उपलब्ध करुन द्या : रुग्णांचे नातेवाईकांची मागणी...
पुर्व हवेलीत मागिल बारा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असले तरी, लोणी काळभोर येथील कोविड केअर सेंटर बंद असल्याने रुग्णांना वाघोली, नऱ्हे, हिंजवडीसह पुण्यात न्यावे लागत आहे. वाघोली, नऱ्हे, हिंजवडीसह पुण्यात पुरुष रुग्ण जाण्यास तयार होत असले तरी, महिला रुग्णांना पाठवण्यास नातेवाईक तयार होत नसल्याचे दिसुन येत आहे. यामुळे आपल्या रुग्णास आपल्याच परिसरात बेड मिळावा यासाठी रुग्णांचे नातेवाईक खासदार, आमदार, जिल्हा परीषद सदस्यांपासून थेट सरपंच, ग्रामपंचायत सदस्य ते पत्रकारांचे उंबरठे झिजवत आहेत. उंबरठे झिजवुनही उपचारासाठी बेडच उपलब्द होत नसल्याने, नागरीकात मोठा असंतोष पसरत असल्याचे दिसुन येत आहे.
आरटीईच्या राखीव जागांसाठी विद्यार्थ्यांना करावी लागणार प्रतिक्षा
आमदार, खासदार यांच्यासह जिल्हास्तरीय नेते नावालाच.....
पुर्व हवेलीमधील अनेक कार्यकर्त्यांना सर्वच राजकीय पक्षानी जिल्हास्तरीय, तालुका पातळीवरील पदे देऊन काम करण्याची संधी दिलेली आहे. मात्र एकाही पक्षाचा पदाधिकारी अथवा कार्यकर्ता आपआपल्या भागातील रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी उपयोगी पडत नसल्याचे दिसुन येत आहे. आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती उपसभापती ते पंचायत समिती सदस्य खंडीभर असतानाही, एकही माई का लाल नागरीकांच्यासाठी रस्त्यावर उतरत नसल्याचे दुर्देवी चित्र नागरीक उघड्या डोळ्याने पहात आहेत. लोणी काळभोर येथील कोविड सेंटर पाच दिवसांपासुन बंद असले तरी, ते तात्काळ चालु करण्यासाठी एकाही नेत्याने अथवा लोकप्रतिनीधीने आवाज उठवल्याचे दिसुन येत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.